Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईचा डब्बावाला जाणार ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकाला; 'ही' खास भेटवस्तू...

मुंबईचा डब्बावाला जाणार ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकाला; ‘ही’ खास भेटवस्तू देणार

Subscribe

मुंबईतील डब्बेवाला आणि ब्रिटनचे राजघराणं यांच्यातील नात खूप खास आहे. तब्बल 20 वर्षांपूर्वी निर्माण झालेले नातं हे अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे ब्रिटनच्या राजघरण्यात असलेल्या प्रत्येक खास कार्यक्रमांना मुंबईच्या डबेवाल्यांना आमंत्रित केले जाते.

मुंबईतील डब्बेवाला आणि ब्रिटनचे राजघराणं यांच्यातील नात खूप खास आहे. तब्बल 20 वर्षांपूर्वी निर्माण झालेले नातं हे अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे ब्रिटनच्या राजघरण्यात असलेल्या प्रत्येक खास कार्यक्रमांना मुंबईच्या डबेवाल्यांना आमंत्रित केले जाते. अशातच आता ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स तृतीय (Britains Prince Charles III) यांचा राज्याभिषेक सोहळा (Coronation Program) होणार आहे. (coronation of britains prince charles iii puneri pagadi will be sent as gift to mumbai dabbawala)

येत्या 6 मे रोजी हा राज्यभिषेक सोहळा होणार आहे. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. लंडनमधील वेस्टमिंस्टर येथे होणाऱ्या या खास कार्यक्रमाला मुंबईच्या डबेवाल्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुंबईच्या डबेवाल्यांकडून प्रिन्स चार्ल्स यांना खास भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

प्रिन्स चार्ल्स तृतीय यांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त मुंबईच्या डबेवाल्यांनी राजा चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला यांच्यासाठी अनेक भेटवस्तू खरेदी केल्या आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांच्या वतीने पुणेरी पगडी आणि वारकरी संप्रदायाची शाल भेट म्हणून देण्यात येणार आहे.

प्रिन्स चार्ल्स यांच्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांची जगभर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. महत्वाचे म्हणजे मुंबईच्या डबेवाल्यांना प्रिन्स चार्ल्स यांच्या लग्नाचे आमंत्रण देखील आले होते. येत्या शनिवारी म्हणजेच 6 मे रोजी जवळच्या हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटण्याचाही कार्यक्रम असणार आहे. शनिवारी जवळच्या रुग्णालयांमध्ये मिठाईचे वाटप करणार आहोत. दरम्यान, प्रिन्स चार्ल्समुळे समाजाला जगभरात ओळख मिळाली. त्यांचा राज्याभिषेक साजरा केले जाणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – बारसू रिफायनरी वाद : ‘हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न कराल तर…’, उद्धव ठाकरेंचा इशारा

- Advertisment -