धारावीत २५ नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या ३६९ वर

धारावीत आज २५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ३६९ वर गेली आहे.

7 new corona positive patient found in dharavi mumbai
धारावीत कोरोनाचा वेग मंदावला; दिवसभरात अवघे ७ रुग्ण आढळले

धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज धारावीत २५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या ३६९ वर गेली आहे. त्यामुळे दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने धारावीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

धारावीत आज सापडलेल्या रुग्णांमध्ये १८ पुरुष, तर ७ महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे कोरोनाबाधित शिवशक्ती नगर, आझाद नगर, कल्याणवाडी, ९० रोड, पिवळा बंगलो, ढोरवाडा, कुंभारवाडा, लेबर कॅम्प, कुंची कुर्वे नगर, ट्रान्झिट कॅम्प, शास्त्री नगर, पीएमजीपी कॉलनी, इंदिरा नगर, ६० रोड, सोशल नगर, चौगुले चाळ, मुस्लिम नगरात याठिकाणाचे आहेत.

माहिममध्ये २ रुग्ण आढळले

तर माहिममध्ये आज दिवसभरात दोन नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ५० वर्षीय महिला आणि ३२ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. हे दोघे नया नगर आणि कॅडल रोड येथील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे माहिममधील एकूण करोनाबाधितांची संख्या ३५नवर पोहोचली आहे. दरम्यान, दादरमध्ये आज दिवसभरात एकही करोनाबाधित रुग्ण सापडला नाही.


हेही वाचा – गाडीवर आमदार असलेल्याचा स्टिकर; पोलिसांनी थांबवले तर…