घरCORONA UPDATEकपिल पाटील यांच्यासहित कुटुंबाला कोरोनाची लागण!

कपिल पाटील यांच्यासहित कुटुंबाला कोरोनाची लागण!

Subscribe

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत आहे. सर्वसामान्य, सेलेब्रेटींबरोबर आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. भिवंडी लोकसभेचे भाजपा खासदार कपिल पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील एकूण सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

खासदार कपिल पाटील हे एकत्र कुटुंबात राहतात. त्यांच्याबरोबर हायवे दिवे येथील निवासस्थानी पत्नी,मुलगा,मुलगी व तीन पुतणे आहे. कपिल पाटील यांच्या पत्नीला सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर घरातील इतर लोकांची चाचणी केली असता. खासदार कपिल पाटील, मुलगा, मुलगी, पुतण्या व दोन सूना असे एकूण आठ जण कोरोनाबाधित आढळून आले.

- Advertisement -

सध्या या र्वांवर उपचार सुरू आहेत. कपिल पाटील यांना सौम्य लक्षणे असल्याने ते सध्या होम क्वारंटाइन झाले आहेत. कुटुंबातील इतर सर्वांची प्रकृर्ती ठीक आहे. अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.


हे ही वाचा – एनकाऊन्टर विकास दुबेचा पण चर्चा मात्र रोहित शेट्टीची!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -