घरCORONA UPDATEमुंबई महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

मुंबई महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

Subscribe

मुंबई महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबई पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांना मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता मुंबई महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना आज, बुधवारी घडली आहे. या घटनेची मुंबई महापालिकेने ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली, चारकोप येथे राहणाऱ्या अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अधिकारी पहिल्या दिवसांपासून धारावीत बेघरांना अन्न पुरवण्याची जबाबदारी पार पाडात होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून त्यांना ताप येत होता. त्यामुळे त्यांनी एस.आर.एल लॅबमध्ये जाऊन कोवीड – १९ ची तपासणी केली होती. त्यांचा कोवीड – १९चा आज रिपोर्ट येणार होता. मात्र, त्या आधीच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी जोगेश्वरी ट्रामा केअर येथे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांना त्यावेळी तीन तास रुग्णवाहिका मिळू शकली नाही. त्यामुळे त्याठिकाणी अधिक वेळ गेला. त्यानंतर त्यांनी जी – उत्तर विभागाशी संपर्क साधत रुग्णवाहिका बोलावून ट्रामा केअर सेंटर गाठले. परंतु, त्यांना त्याठिकाणी दाखल करुन न घेता त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – धारावीमध्ये १४ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या ३४४ वर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -