घरCORONA UPDATECorona In Mumbai: मुंबईत पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढला, बाधितांचा आकडा २ लाख...

Corona In Mumbai: मुंबईत पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढला, बाधितांचा आकडा २ लाख पार!

Subscribe

मुंबईत पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २ हजार ५५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ७७५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८ हजार ८३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

मुंबईत आज दिवसभरात १ हजार ९४४ रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत.  आतापर्यंत मुंबईत १ लाख ६४ हजार ८८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या २६ हजार ६६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच ४० मृत्यूपैकी २७ रुग्ण पुरुष आणि १३ रुग्ण महिला होत्या. एकाचे वय ४० वर्षाखाली होते. २८ जणांचे वय ६० वर्षा वर होते, तर उर्वरित ११ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ८२ टक्के एवढा आहे. तसेच २७ सप्टेंबरपर्यंत मुंबईत १० लाख ९१ हजार ५३७ कोरोनाच्या एकूण चाचण्या आहेत. दरम्यान मुंबईतील दुप्पटीचा दर ६७ दिवस आहे.


हेही वाचा – दिलासादायक! राज्यातील रिकव्हरी रेटमध्ये वाढ, १० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -