भयंकर! कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्कारास गाव झालं गोळा!

Coronavirus, covid19 symptoms, coronavirus fatality, icmr issued guidance, covid19 deaths, icmr corona guideline, deaths due to corona, corona deaths data, India News in Hindi, Latest India News Update, ICMR issued New criteria for covid 19 deaths, आयसीएमआर, राष्ट्रीय विषाणूविज्ञान परिषद, नव्या गाईडलाईन्स
कोरोना मृत्यू आकडेवारी ठरविण्यासाठी नवीन निकष, ICMR चा मोठा निर्णय !

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण तरीही अजूनही लोकांमध्ये कोरोनाबाबत जागृकता निर्माण झालेली नाहीये. घरातच राहणे, घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे वारंवार सांगूनही अद्याप नागरिकांमध्ये जागृकता निर्मणा झालेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचे नवनवीन रूग्ण सापडत आहेत. वसई विरार मध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत असताना अर्नाळा परिसरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या परिसरातील एक करोना बाधित रुग्णाच्या मयताला ५०० हून अधिक लोकांनी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे आता  अर्नाळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अर्नाळा येथे राहणारे ५८ वर्षीय प्रतिष्ठित गृहस्थ यकृताच्या आजारासाठी वसईच्या कार्डिनल ग्रेसीस (बंगली) रुग्णालयात उपचार घेत होते. या रुग्णांच्या मृत्यू नंतर त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल हाती आले नसतानाही रुग्णलयाने त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला आणि नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी गर्दी केली. त्यांचे अंत्यसंस्कार उरकलया नंतर त्यांच्या कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक असल्याची माहिती मिळाली.

गुरूवारी सकाळी १० वाजता अर्नाळा येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील सुमारे पाचशेहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. या गावातील १७ जण आधीच करोनाबाधित आहेत.  रुग्णलयाने कोविड चाचणी अहवाल आला नसताना मृतदेह ताब्यात दिला कसा असा प्रश्न उभा राहिला आहे.

या विषयी बोलताना रुग्णालयाच्या महाव्यवस्थापक म्हणाले की, रुग्णाला कोणतीही कोविडची प्रभावी लक्षण दिसून येत नव्हती. त्याच बरोबर आमच्या कडे मुतदेह ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे नातेवाईकांच्या मागणीमुळे सर्व शासकीय नियमांचे पालन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

आम्ही रुग्णालयाला नोटीस बजावत आहोत. त्याच प्रमाणे योग्य चौकशी घेऊन आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पुढील कारवाई केली जाईल. अशी माहिती वसई तालुका वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब जाधव यांनी माहिती दिली. अंत्यसंस्कारासाठी केवळ अर्नाळा नाही तर आसपासच्या अनेक गावातुन नातेवाईकांनी हजेरी लावली होती. सध्या प्रशासनाकडून या अंत्यसंस्कारासाठी कोण कोण आले होते याची माहिती घेणे सुरू आहे.


हे ही वाचा – मुलींचे आई होण्याचे वय ठरवणार मोदी सरकार, घेतला हा निर्णय!