घरCORONA UPDATEजगभर Coronavirus पसरवणारा पहिला रुग्ण सापडला!

जगभर Coronavirus पसरवणारा पहिला रुग्ण सापडला!

Subscribe

जागतिक साथीचा माहामारीचा रोग असणारा या कोरोना व्हायरस आतापर्यंत १४० देशांमध्ये एण्ट्री केली

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना देशभरासह राज्यात देखील कोरोनाने बळी घेणाऱ्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या व्हायरसच्या संपर्कात जो आला त्या हजारोंचा जीव गेला असून हा व्हायरस चीनमधून जगभरात वणव्या सारख्या पसरत चालला आहे. परंतू, या भयावह जीवघेण्या व्हायरसचा पहिला रूग्ण सापडल्याचे वृत्त समोर आले आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरसची लागण प्रथम सुरू झाली. जागतिक साथीचा माहामारीचा रोग असणारा या कोरोना व्हायरस आतापर्यंत १४० देशांमध्ये एण्ट्री केली आहे.

‘या’ महिलेमुळे जगभर पसरला कोरोना

वैश्विक महामारी बनलेल्या कोराना व्हायरसची लागण झालेला जगातील पहिला रूग्ण सापडला आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार, चीनच्या वुहानमध्ये ५७ वर्षांच्या वेई गायक्सियन असं त्या महिलेचे नाव असून कोरोना व्हायरसची लागण सर्वात प्रथम झाल्याने त्या महिलेल्या कोरोना संक्रमणाचा ‘पेशंट झिरो’ असे म्हटले जाते. हीच महिला कोरोनाचा पहिला शिकार ठरली आहे. या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर महिनाभर रूग्णालयात उपचारासाठी दाखल होती. जानेवारीमध्ये ही महिला पूर्णतः बरी झाली.

- Advertisement -

हा होता त्या महिलेचा व्यवसाय

अहवालानुसार ही महिला चीनमधील वुहानमध्ये मासळी बाजारात कोळंबी विकण्याचा व्यवसाय करत आहे. १० डिसेंबर २०१९ रोजी तिला कोरोनाव्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर तिला प्रथम सर्दी आणि तापाची लक्षण दिसून आली. सुरूवातीला हा ताप अगदी सामान्य वाटत होता. सुरूवातीला ही महिला स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी गेली होती, मात्र त्याचा कोणताही फरक पडला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वुहानच्या इलेवंथ रुग्णालयात ही महिला उपचार घेण्यास गेली. तिथंही प्रकृतीत सुधारणा झाली नाही, त्यानंतर १६ डिसेंबरला वुहानमधील सर्वात मोठं असलेलं वुहान युनियन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर फक्त वेईच नाही तर हुन्नान बाजारात काम करणारे अनेक लोकं अशा तक्रारी घेऊन येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत डॉक्टरांना या संसर्गजन्य आजाराबाबत माहिती मिळाली. त्यानंतर सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले.

COVID-१९ चा पहिला रुग्ण १ डिसेंबरला वुहानमध्ये दिसला

लँसेट मेडिकल जनरलनुसार COVID-१९ चा पहिला रुग्ण १ डिसेंबरला चीनच्या वुहानमध्ये दिसून आला होता. मासळी बाजारात मटण विक्रेते ज्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करत होते, त्याचाच वापर वेईने केल्याचे तिने सांगितले जात आहे. एक महिना योग्य तो उपचार घेऊन क्वारंटाइन राहून जानेवारी महिन्यात वेई या महिलेचा चाचणीचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला.या आजारातून पूर्णपणे ही महिला बरी झाली. सुरूवातीला कोरोना व्हायरस झालेल्या २७ रूग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये मासळी बाजारातील २४ जण होते.


Corona Live Update : जगभरात कोरोनाचं थैमान, अमेरिकेने ३० एप्रिलपर्यंत वाढवला लॉकडाऊन!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -