घरCORONA UPDATECoronavirus: राज्यात कोरोनाचा विस्फोट; आज ७७८ नवीन रुग्णांची नोंद, १४ मृत्यू

Coronavirus: राज्यात कोरोनाचा विस्फोट; आज ७७८ नवीन रुग्णांची नोंद, १४ मृत्यू

Subscribe

लॉकडाऊननंतर कोरोनाच्या रुग्णांचा विस्फोट होईल, अशी शक्यता वर्तवली जात असताना गेल्या काही दिवसांपासून राज्यात सापडत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येवरून महाराष्ट्र विस्फोटाच्या दिशेने पावले टाकत असल्याचे दिसून येत आहे. २३ एप्रिलला राज्यात तब्बल ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ६४२७ झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यात १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २८३ झाली आहे. तसेच राज्यातून ८४० रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

राज्यामध्ये आठवडाभरापासून सातत्याने ३०० ते ५०० च्या दरम्यान रुग्ण सापडत असताना गुरुवारी तब्बल ७७८ नवे रुग्ण सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ६४२७ वर पोचली आहे. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यात गुरुवारी १४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २८३ झाली आहे. गुरुवारी झालेल्या १४ मृत्यूंमधील मुंबई ६, पुणे ५, नवी मुंबई १, नंदूरबार १ आणि धुळे मनपा येथे एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये ८ पुरुष तर ६ महिला आहेत. यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील २ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. दोन रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकली नाही उर्वरित १२ मृत्यूंपैकी ७ रुग्णांमध्ये (५८ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

- Advertisement -

राज्यामध्ये आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ४७७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून ७४९१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २७.२६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात १,१४,३९८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सध्या राज्यात २०८ कॅटेगिरी १ रुग्णालये, ४८३ कॅटेगिरी २ रुग्णालये कार्यरत आहेत. तर राज्यभरात ८७२ कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. या एकूण १५६३ रुग्णालयांमध्ये १,६१,४९९ खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत, या रुग्णालयांमध्ये ६०७७ एवढी अतिदक्षता विभागातील बेडस उपलब्ध असून एकूण २५०९ व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
१ मुंबई महानगरपालिका ४२०५ १६७
२ ठाणे ३४ २
३ ठाणे मनपा २१४ ४
४ नवी मुंबई मनपा ९७ ४
५ कल्याण डोंबवली मनपा १२४ ३
६ उल्हासनगर मनपा २ ०
७ भिवंडी निजामपूर मनपा ८ ०
८ मीरा भाईंदर मनपा ११६ २
९ पालघर २१ १
१० वसई विरार मनपा १०९ ३
११ रायगड १४ ०
१२ पनवेल मनपा ३६ १
ठाणे मंडळ एकूण ४९८० १८७
१३ नाशिक ४ ०
१४ नाशिक मनपा ७ ०
१५ मालेगाव मनपा १०९ ९
१६ अहमदनगर २४ २
१७ अहमदनगर मनपा ८ ०
१८ धुळे ४ १
१९ धुळे मनपा १३ १
२० जळगाव ६ १
२१ जळगाव मनपा २ १
२२ नंदूरबार ७ १
नाशिक मंडळ एकूण १८४ १६
२३ पुणे ४१ १
२४ पुणे मनपा ८१२ ५९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५७ २
२६ सोलापूर १ ०
२७ सोलापूर मनपा ३२ ३
२८ सातारा २० २
पुणे मंडळ एकूण ९६३ ६७
२९ कोल्हापूर ६ ०
३० कोल्हापूर मनपा ३ ०
३१ सांगली २५ ०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १ १
३३ सिंधुदुर्ग १ ०
३४ रत्नागिरी ७ १
कोल्हापूर मंडळ एकूण ४३ २
३५ औरंगाबाद ० ०
३६ औरंगाबाद मनपा ४० ५
३७ जालना ३ ०
३८ हिंगोली ७ ०
३९ परभणी ० ०
४० परभणी मनपा १ ०
औरंगाबाद मंडळ एकूण ५१ ५
४१ लातूर ८ ०
४२ लातूर मनपा ० ०
४३ उस्मानाबाद ३ ०
४४ बीड १ ०
४५ नांदेड ० ०
४६ नांदेड मनपा १ ०
लातूर मंडळ एकूण १३ ०
४७ अकोला ११ १
४८ अकोला मनपा ९ ०
४९ अमरावती ० ०
५० अमरावती मनपा ७ १
५१ यवतमाळ १७ ०
५२ बुलढाणा २४ १
५३ वाशिम १ ०
अकोला मंडळ एकूण ६९ ३
५४ नागपूर २ ०
५५ नागपूर मनपा ९८ १
५६ वर्धा ० ०
५७ भंडारा ० ०
५८ गोंदिया १ ०
५९ चंद्रपूर ० ०
६० चंद्रपूर मनपा २ ०
६१ गडचिरोली ० ०
नागपूर एकूण १०३ १
इतर राज्ये २१ २
एकूण ६४२७ | २८३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -