घरCORONA UPDATECoronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १०४४ नवे रुग्ण, आज ३२ मृत्यू

Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १०४४ नवे रुग्ण, आज ३२ मृत्यू

Subscribe

मुंबईतल्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या आरोप-प्रत्यारोपांचा विषय झाली आहे. मात्र, त्यातून मुंबईतल्या कोरोनाची परिस्थिती मात्र बदलत नाहीये. आज दिवसभरात राज्यात १ हजार ४४ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत एक हजाराहून जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. आता मुंबईतल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३ हजार ८३५ झाली आहे. त्यासोबतच ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा देखील १ हजार ९७ झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे २४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ९ हजार ५४ झाला आहे.

corona cases in mumbai

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -