Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १२७४ नवे रुग्ण, आज ५७ मृत्यू

एकीकडे राज्यात आज दिवसभरात २७३९ नवे कोरोना रुग्ण सापडले असताना त्यातले १२७४ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांचा आकडा आता ४७ हजार १२८ इतका झाला आहे. याशिवाय आज दिवसभरात राज्यात १२० रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी त्यातले ५७ मृत्यू एकट्या मुंबईत झाले आहेत. त्यामुळे मुंबई अजूनही कोरोनाबाबत हॉटस्पॉटच असून मुंबईतली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली आहे. आज मुंबईतल्या विविध रुग्णालयांमधून १२७४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतल्यामुळे ही मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बाब म्हणता येईल. मात्र, एकूण मृतांचा आकडा १५७५ पार गेलेला असताना काळजी देखील कमी होण्याचं नाव घेत नाहीये.

mumbai corona cases