मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा सातत्याने वाढतानाच दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत तब्बल १३०० नव्या बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांचा आकडा आता ७५ हजार ४७ इतका झाला आहे. त्यासोबतच आज दिवसभरात २३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे आता मुंबईतल्या मृतांचा आकडा देखील ४ हजार ३६९च्या घरात गेला आहे. आजच्या दिवसातली दिलासादायक बाब म्हणजे २४ तासांत ८२३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्यामुळे कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ४३ हजार १५४ इतका झाला असून मुंबईतल्या अॅक्टिव रुग्णांची संख्या २७ हजार ५२४ झाली आहे.