Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १३११ नवे रुग्ण, ६९ रुग्णांचा मृत्यू

Mumbai Corona Update 2510 corona patients registered in mumbai today
Mumbai Corona Update: ब्रेकिंग! मुंबईत बुधवारी २,५१० नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले

मुंबईमध्ये १३११ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ८४ हजार १२५ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४८९६ वर पोहचला आहे.

मुंबईमध्ये रविवारी १३११ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ६१ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४२ पुरुष तर २७ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ४ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ४३ जण हे ६० वर्षांवरील, तर २२ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. ६९ मृत्यू हे गत ४८ तासांमधील आहेत.

मुंबईत कोरोनाचे ९३२ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ५८ हजार ४१९ वर पोहचली आहे. तसेच २४२० रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ५५ हजार ९८३ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.