Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १३८३ नवे रुग्ण, आज ६९ मृत्यू

new corona cases in mumbai

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून रोज ३ हजाराहून जास्त रुग्ण सापडत असताना मुंबईत देखील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आज दिवसभरात मुंबईत १३८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांचा आकडा ५६ हजार ७४० इतका झाला आहे. यातले २५ हजार ९४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात मुंबईत कोरोनामुळे तब्बल ६९ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे आता मुंबईतल्या मृतांचा आकडा २१११ इतका झाला आहे. आज मृत्यूमुखी पडलेल्या ६९पैकी ४७ रुग्णांना इतर आजार झाले होते. ४७ पुरूष तर २२ महिला रुग्ण होते. ७ मृत्यू ४० वर्षांखालील, ३७ मृत्यू ६० वर्षांवरील तर २५ मृत्यू ४० ते ६० वयोगटातील होते.

bmc letter of mumbai corona cases