Coronavirus Mumbai: आज मुंबईत ४० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

coronavirus image
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईत सोमवारी ४० कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु ज़ाल्याची माहिती पालिका आरोग्य विभागकडून देण्यात आली आहे.
याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वाढती रुग्ण संख्यावर नियंत्रण मिळविणे शक्य होत असल्याचा दावा पालिका आरोग्य विभाग करत असले तरीही वाढती रुग्ण संख्या पाहता हा दावा फोल ठरत आहे. सोमवारी मुंबईमध्ये १४१३ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४० हजार ८७७ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १३१९ वर पोहचला आहे.

मृत्यू झालेल्या ४० पैकी २६ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २१ पुरुष तर १९ महिलांचा समावेश आहे. २० जण हे ६० वर्षांवरील, तर २० रुग्ण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते, अशी माहिती पालिका साथ रोग कक्षाकडून देण्यात आली आहे.

तसेच मुंबईत सोमवारी कोरोनाचे ६७० संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३१ हजार ७३९ वर पोहचली आहे. तसेच १९३ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १६,९८७ जणांना घरी सोडण्यात आल्याचे आरोग्य विभागकड़ून सांगण्यात आले.