घरCORONA UPDATECoronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १४३८ नवे रुग्ण, आज ३८ मृत्यू

Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १४३८ नवे रुग्ण, आज ३८ मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६० हजारांच्या जवळ पोहोचली असतानाच मुंबईतही कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मुंबईत आज दिवसभरात १४३८ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या एकूण सापडलेल्या रुग्णांचा आकडा ३५ हजार २७३ झाला आहे. यात आज ७६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ९ हजार ८१७ झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत ३८ रुग्णांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ११३५ झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या प्रशाससानासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

mumbai corona cases

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -