घरCORONA UPDATECoronavirus Mumbai: मुंबईत कोरोनाचे १४४२ नवे रुग्ण; ४८ मृत्यू

Coronavirus Mumbai: मुंबईत कोरोनाचे १४४२ नवे रुग्ण; ४८ मृत्यू

Subscribe

मुंबईमध्ये गुरुवारी १४४२ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४४ हजार ७०४ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४६५ वर पोहचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या मागील आठवडयापासून रुग्णांमध्ये सातात्याने वाढ होत असून, गुरुवारी कोरोना रुग्ण संख्या ४४ हजार ७०४ एवढी झाली आहे. मुंबईमध्ये गुरुवारी ४८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ३३ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३३ पुरुष तर १५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील सात जणाचे वय ४० वर्षांखाली आहे. २३ जणाचे वय हे ६० वर्षांवरील, तर १८ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

गुरुवारी मुंबईत कोरोनाचे ८४५ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३४ हजार ०६५ वर पोहचली आहे. तसेच ६२६ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १८ हजार ०९८ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, चक्रीवादळ, बुधवारी आणि गुरुवारी सतत कोसळत असलेला पाऊस यामुळे येत्या काही दिवसात कोरोना आजाराबरोबर पावसाळी आजार देखील वाढन्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, ज्यामुळे मुंबईकरानी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन पालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -