घरCORONA UPDATEमुंबईत आज १ हजार ४६० नव्या रुग्णांची नोंद; ४१ मृत्यू

मुंबईत आज १ हजार ४६० नव्या रुग्णांची नोंद; ४१ मृत्यू

Subscribe

मुंबईत लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोरोनाचे रुग्ण अजूनच वाढत आहेत. मुंबईत आज १ हजार ४६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ७३ हजार ७४७ वर पोहचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २ हजार ५८७ रुग्ण आज दिवसभरात बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनातून बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ४२ हजार ३३१ इतकी झाली आहे. तर २७ हजार १३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

गेल्या २४ तासांत प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांपैकी ४१ मृत्यू गेल्या ४८ तासांत झाले होते आणि उर्वरित ६४ मृत्यु अगोदरचे होते, असं महापालिकेने म्हटलं आहे. मृतांमध्ये ८८ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ७२ पुरुष तर ३३ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ७ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ६९ जण हे ६० वर्षांवरील, तर ४१ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईत कोरोनाचे ८८८ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ५१ हजार २४४ वर पोहचली आहे. तसेच २ हजार ५८७ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ४२ हजार ३३१ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -