घरCORONA UPDATECoronavirus in Mumbai: मुंबईत १७२५ नवे रुग्ण, तर ३९ रुग्णांचा मृत्यू

Coronavirus in Mumbai: मुंबईत १७२५ नवे रुग्ण, तर ३९ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत रविवारी १७२५ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ३० हजार ३५९ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९८८ वर पोहचला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून रविवारीही मुंबईमध्ये तब्बल १७२५ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३० हजार ३५९ वर पोहचली आहे. २१ ते २२ मेपर्यंत ३५९ चाचण्यांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याने त्यांचाही यात समावेश आहे.

मुंबईमध्ये ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ९८८ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या ३९ जणांमधील २४ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २० पुरुष तर १९ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १६ जण हे ६० वर्षांवरील, तर २३ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचे ८०८ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार १३१ वर पोहचली आहे. तसेच ५९८ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ८०७४ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -