Eco friendly bappa Competition
घर CORONA UPDATE Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १७५१ नवे रुग्ण, आज २७ मृत्यू

Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १७५१ नवे रुग्ण, आज २७ मृत्यू

Subscribe

राज्याप्रमाणेच मुंबईत देखील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल १७५१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा २७ हजारांच्याही वर जात २७ हजार ६८ इतका झाला आहे. मुंबईत आज एकूण २७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ९०९ झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोनाने अजूनही हातपाय आवरलेले नसल्याचंच दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बाब ठरली आहे. मुंबईत आज दिवसभरात ३२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ७०८० इतका झाला आहे.

mumbai corona cases letter

- Advertisement -

दरम्यान, आज मृत पावलेल्या २७ रुग्णांपैकी २२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यापैकी १८ जण हे पुरूष आहेत तर ९ रुग्ण महिला आहेत. एकूण मृत रुग्णांपैकी फक्त एका रुग्णाचं वय ४० वर्षांच्या खालील होतं. तर १३ रुग्णांचं वय हे ६० वर्षांच्या वर होतं. उरलेले १३ रुग्ण ४० ते ६० वर्षे वयोगटातले होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -