घरताज्या घडामोडीCoronavirus Mumbai: मुंबईत आज ९९५ नव्या रुग्णांची नोंद; ६२ मृत्यू

Coronavirus Mumbai: मुंबईत आज ९९५ नव्या रुग्णांची नोंद; ६२ मृत्यू

Subscribe

आज दिवसभरात ९०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबईतील सोमवारच्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत कमी नोंद करण्यात आली आहे. आज मंगळवारी मुंबईत आज दिवसभरात ९९५ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३ हजार २६२ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ६२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत एकूण ५ हजार ८१४ जणांना मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तर ९०५ रुग्ण आज दिवसभरात बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनातून बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७३ हजार ५५५ इतकी झाली आहे. तर २३ हजार ८९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृतांमध्ये ४६ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४४ पुरुष तर १८ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील २ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २८ जण हे ३९ वर्षांवरील, तर २१ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईत कोरोनाचे ८९७ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ७१ हजार ९३२ वर पोहचली आहे. तसेच ९०५ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ७३ हजार ५५५ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.


Corona Update: राज्यात २४ तासांत ८,३६९ नवे रूग्ण; २४६ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -