Vaccination : जे.जे. रुग्णालयात डॉक्टर आणि ज्येष्ठांना अमित देशमुखांच्या उपस्थितीत बुस्टर डोस

पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मोठ्या प्रमाणात डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होत आहे.आजपासून राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्याबरोबरच आरोग्य कर्मचारी, कोविडकाळात आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि साठ वर्षे वयावरील सहव्याधीग्रस्त यांना प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे.

common cold t cells may offer protection against coronaviru says uk study

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर थैमान घालत आहे. त्यातच पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मोठ्या प्रमाणात डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होत आहे.आजपासून राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्याबरोबरच आरोग्य कर्मचारी, कोविडकाळात आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि साठ वर्षे वयावरील सहव्याधीग्रस्त यांना प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे.आज सोमवारी 10 जानेवारीला सकाळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत जे.जे. रुग्णालयात या प्रतिबंधात्मक मात्रा देण्याच्या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जे.जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, लसीकरण प्रमुख डॉ.ललित संखे यांच्यासह डॉक्टर आणि जे.जे. रुग्‍णालाचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिबंधात्मक मात्रा दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांच्यासह आरोग्य कर्मचारी याबरोबरच 60 वर्षावरील सहव्याधीग्रस्त यांना प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे.

डॉक्टरांची कमतरता भासल्यास कंत्राटी पदे भरणार – अमित देशमुख

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये काम करणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, पॅरामेडिकल कर्मचारी यांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा होताना दिसत आहे. त्यामुळे डॉक्टर अथवा पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची कमतरता भासल्यास कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ भरले जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी दिली.राज्यात कोरोनचा वाढता प्रादुर्भाव आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी देशमुख यांनी आज बैठक घेतली. बैठकीत शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमडेसिव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.


हे ही वाचा :- कोरोनाबाधित रुग्णासोबत एका नातेवाईकाला राहण्याची मुभा ; अमित देशमुखांचा निर्णय