घरमुंबईCorona: 'या' नामांकित कंपनीने बंद केलं मुंबईचे ऑफिस, मात्र सेवा राहणार सुरू

Corona: ‘या’ नामांकित कंपनीने बंद केलं मुंबईचे ऑफिस, मात्र सेवा राहणार सुरू

Subscribe

कोविड -१९ च्या संकटामुळे व्यवसायावर वाईट परिणाम होत असल्याने, कंपनीने मुंबईतील ऑफिस बंद करण्याचा घेतला निर्णय

देशव्यापी लॉकडाऊनमुळे बर्‍याच आर्थिक नुकसानानंतर अनेक लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बऱ्याच कंपन्यांनी आपली ऑफिसे भाड्याने दिली आहेत किंवा ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. CNBCTV 18 ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, अ‍ॅपवर आधारित मुंबईकरांना भाड्याने टॅक्सी सेवा पुरविणारी अमेरिकन कंपनी उबर (UBER) ने भारतातील मुंबई ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

कंपनीतील सूत्रांनी CNBCTV 18 ला सांगितले की, जागतिक पातळीवर ४५ ऑफिसेस बंद करण्याच्या या हालचालीचा भाग म्हणून ही कारवाई केली गेली आहे. तर, कंपनीच्या मते, मुंबईकरांसाठी राइड-शेअरिंग सेवा सुरू राहणार आहे.

कोविड -१९ च्या संकटामुळे व्यवसायावर वाईट परिणाम होत असल्याने, कंपनीने मुंबईतील ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुंबईतील ऑफिस मुंबईच्या कुर्ला भागात आहे. हे कार्यालय भारतातील गुरुग्राममध्ये कंपनीच्या मुख्यालयांतर्गत पश्चिम विभागाचे मध्यवर्ती ऑफिस होते.

- Advertisement -

कोरोनाच्या या संकटादरम्यान, उबरने आपल्या १४ टक्के कर्मचार्‍यांनाची कपात केली म्हणजेच ३ हजार ७०० कर्मचार्‍यांपैकी काढून टाकले आहे. गेल्या महिन्यात, उबरने ZOOM च्या माध्यमातून या कर्मचार्‍यांना व्हिडिओ कॉल केला आणि सांगितले की, कोविड -१९ महामारी एक मोठे आव्हान बनले आहेत. हे टाळण्यासाठी उबर कंपनीने कर्मचार्‍यांना सांगितले की, आता कंपनीला तुमची आवश्यकता नाही आहे.

उबरच्या मुंबई कार्यालयात जवळपास २५ कायमस्वरूपी कर्मचारी आणि दीडशेहून अधिक कंत्राटी कामगार आहेत. कंपनीने कार्यालय बंद करण्याच्या या निर्णयामुळे बहुतेक त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. काही कर्मचारी कंपनीच्या ऑपरेशन आणि धोरणांतर्गत कंपनीत पूर्णपणे कार्य करत राहतील. तर कंपनीने CNBCTV 18 ला सांगितले की, उबर मुंबईकरांना उच्च स्तरीय सेवा देत राहणार आहे.


शौक बड़ी चीज है! कोरोनाच्या बचावासाठी सोन्याचं मास्क! किंमत तर बघा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -