घरCORONA UPDATE'त्यामुळे आता लष्कराला पाचारण करणे हा एकमेव पर्याय'

‘त्यामुळे आता लष्कराला पाचारण करणे हा एकमेव पर्याय’

Subscribe

मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करणे हा एकमेव पर्याय अल्यासचे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे.

राज्यात कोरोनाचे संकट असून आता मुंबईतील आकड्यामध्ये सर्वाधिक वाढ होत आहे. यामुळे आता विरोधक राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेवर टीका करताना दिसत आहेत. यातच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करणे हा एकमेव पर्याय असल्याचे ट्विट केले आहे. तसेच महापालिकेत खूप गोंधळ उडाला असून, जर काहीच बदलले नाही तर गोष्टी हाताबाहेर निघून जातील अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. एकमेकांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचेही ते म्हणाले आहेत.

काय म्हणालेत नितेश राणे?

‘मुंबई महापालिकेत खूप गोंधळ आहे. जर काही बदल झाले नाही तर मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर निघून जाईल. खरी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. जी आकडेवारी दाखवली जात आहे त्यापेक्षा ही संख्या खूप मोठी आहे’. नितेश राणे यांनी लवकरच नवे महापालिका आयुक्त निवडले जाणार का ? असा प्रश्नही विचारला आहे. पुढे ते म्हणाले आहेत की, ‘आरोप-प्रत्यारोपांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करणे हा एकमेव पर्याय आहे’ , असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

तर कोरनाच्या लढाईत पालिका हताश

दरम्यान, भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिका करत असलेल्या कोरोनाच्या कामातील अनेक त्रुटी आणि मुंबईकरांचे होत असलेले हाल, यावर प्रकाशझोत टाकला होता. आज या परिस्थितीत मुंबई महापालिका ज्या पद्धतीने काम करत आहे ते पाहिल्यावर पुन्हा एकदा २६ जुलैच्या पुरात मुंबईचे जे हाल झाले होते आणि महापालिकेची जी परिस्थिती होती, तसेच चित्र आज पहायला मिळते आहे असे, आशिष शेलार म्हणाले होते. श्रीमंत मुंबई महापालिकेचा कारभार २६ जुलैच्या पुरानंतर उघडा पडला होता. तशाच मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील अनेक गोष्टी आज उघड्या पडल्या आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली होती.

- Advertisement -

हेही  वाचा – CoronaVirus: कोरोना विरोधात लढा देण्यासाठी आयआयटी मुंबईने तयार केली उपकरणे!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -