Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई डहाणू, विरार रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा ! पश्चिम रेल्वे ७ एप्रिलपासून मेमू...

डहाणू, विरार रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा ! पश्चिम रेल्वे ७ एप्रिलपासून मेमू गाड्या चालवणार

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी २२ मार्च २०२० पासून लांब पल्ल्याच्या काही मेमू गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र या गाड्यांच्या फेऱ्या ७ आणि ८ एप्रिलपासून सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या अनारक्षित गाड्यांमुळे आता विरार, डहाणूसह गुजरातपर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे.

यापूर्वीच असलेल्या शटल गाड्यांचे मेमू गाड्यांमधे रुपांतर करण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी रेल्वेनंतर आरक्षित लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु झाल्या. मात्र यानंतरही आंतरराज्य प्रवास करणाऱ्या मेमू गाड्या अद्याप बंद होत्या.

- Advertisement -

परंतु आता विरारहून सुरत, भरूच, वलसाड व डहाणू या ठिकाणी जाणाऱ्या मेमू सेवा ७ व ८ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे विरार, डहाणूपासून पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी दिलासा मिळत आहे. या दररोज डहाणू ते बोरिवली तसेच बोरिवली ते वलसाड फेरी सुरू झाल्याने नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळत आहे. यादरम्यान आता पनवेल-डहाणू रोड तसेच बोईसर-दिवा यादरम्यान धावणाऱ्या मेमू गाडीच्या फेऱ्याही सुरु कराव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या या मागणी योग्य प्रतिसाद अद्याप दिला नाही. त्यामुळे विरारपलीकडच्या पश्चिम उपनगमध्ये राहणाऱ्या आणि कामनिमित्त मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गाड्यांचे वेळापत्रक

सुरत-विरार – मेमू क्रमांक – ०९०८०

६ एप्रिल : सुरतहून संध्याकाळी ६.३५ ला सुटून विरारला रात्री ११.३५ ला पोहचेल.

सुरत-विरार – मेमू क्रमांक – ०९२०२

- Advertisement -

७ एप्रिल : सुरतहून संध्याकाळी ४.२५ ला सुटून विरारला रात्री ९.२० ला पोहचेल.

डहाणू-बोरीवली – मेमू क्रमांक – ०९०८४

८ एप्रिल : डहाणूहून पहाटे ४.५५ ला सुटून बोरीवलीला सकाळी ६.४० ला पोहचेल.

विरार-भरूच मेमू क्रमांक – ०९१०१

७ एप्रिल : विरारहून पहाटे ४.३५ ला सुटून भरूचला सकाळी ११.२० ला पोहचेल.

बोरीवली-वलसाड – मेमू क्रमांक – ०९०८५

८ एप्रिल : बोरीवलीहून सकाळी ७.२० ला सुटून वलसाडला सकाळी ११.१० ला पोहचेल.

विरार-डहाणू – मेमू क्रमांक – ०९०८३

७ एप्रिल : विरारहून रात्री १०.५० ला सुटून डहाणूला रात्री १२.१५ ला पोहचेल.


हेही वाचा- नवे संकट! राज्यात ६ दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक


 

- Advertisement -