घरCORONA UPDATE'मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करा', पोलिसांच्या मागणीवर पालिकेचे अधिकारी म्हणतात...

‘मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करा’, पोलिसांच्या मागणीवर पालिकेचे अधिकारी म्हणतात…

Subscribe

महापालिका अधिकारी आणि मुंबई पोलीस यांच्यात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत मुंबई पोलिसांनी गोरेगाव ते दहिसरदरम्यान चार भागांमध्ये लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला.

कोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई पोलिसांनी काही भागांमध्ये लॉकडाउन लागू करण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवला आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र हे शक्य नसल्याचं म्हटलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनचे होणारे उल्लंघन बघता पोलिसांनी हा प्रस्ताव ठेवला होता. कारण गेल्या आठवड्यात मुंबईच्या उत्तर उपनगरांमध्ये पोलिसांत दाखल झालेल्या प्रत्येक चार गुन्ह्यांमागे तीन गुन्हे हे लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्याच्या प्रकरणातील होते.

महापालिका अधिकारी आणि मुंबई पोलीस यांच्यात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत मुंबई पोलिसांनी गोरेगाव ते दहिसरदरम्यान चार भागांमध्ये लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी सध्या लॉकडाउन लागू न करण्याचे जाहीर केलं.

- Advertisement -

दहिसरमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्ण

दहिसरमध्ये कोरोनाचा डबलिंग रेट मोठ्या प्रमाणात असल्याचं निदर्शनास आलं आहे. आर-नॉर्थ वॉर्डमध्ये येणाऱ्या या ठिकाणी १६ दिवसांचा डबलिंग रेट असून शुक्रवारी १३१८ कोरोना रग्णांची नोंद झाली. १८ दिवसांचा डबलिंग रेट असणाऱ्या या वॉर्डमध्ये शुक्रवारी १८८२ रुग्णांची नोंद झाली. शनिवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबईचा डबलिंग रेट ३४ दिवस आहे. पी-नॉर्थ वॉर्डमध्ये शहरातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. मालाड पूर्व येथे गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा पूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आला होता. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पी-नॉर्थ वॉर्डचाही समावेश आहे.

शनिवारी आर-सेंट्रल वॉर्डच्या सहाय्यक मनपा आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी सांगितलं की, “मुंबई पोलिसांनी या चार ठिकाणी लॉकडाउन लागू कऱण्याचा प्रस्ताव ठेवला असला तरी तो व्यवहार्य नाही. माझ्या वॉर्डमध्ये ७० टक्के केसेस या मोठ्या इमारतींमधील असून ३० टक्के रुग्ण झोपडपट्ट्यांमधील आहेत. या आधीच कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर आहेत. मोठ्या इमारतींमधील रुग्णसंख्या जास्त असल्याने आम्ही त्यांच्या हालचालींवर निर्बंध आणत आहोत”.

- Advertisement -

“गेल्या १० दिवसांपासून मालाड पूर्व येथील आप्पापाडा आणि कोकणीपाडा येथे पूर्ण लॉकडाउन असून चांगले परिणाम समोर आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. यामुळे आम्ही या दोन ठिकाणी तसंच कांदिवली पूर्व येथील काजूपाडा आणि दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगर येथे लॉकडाउन वाढवण्याचं महापालकेला सुचवलं. अशी माहिती आयपीएस अधिकाऱ्याने दिली आहे.


हे ही वाचा – भारतीय जवानांनी चीनच्या काही सैनिकांना बंदी बनवलं होतं, केंद्रीय मंत्र्याचा दावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -