घरCORONA UPDATEचिंता वाढली! कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी!

चिंता वाढली! कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी!

Subscribe

राज्यात कोरोनाचं संकट आल्यापासून पोलीस बांधव कोरोना योद्धे म्हणून रस्त्यावर उतरून आपली ड्युटी करत आहेत.  आता या पोलीस विभागालाच कोरोनाची लागण झाली असून आत्तापर्यंत तब्बल २ हजारहून जास्त मुंबई पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.  या कोरोनाने राज्यातील आणखी एका पोलिसाचा बळी घेतला आहे. राज्यात आजपर्यंत ४० हून अधिक पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जेव्हा लॉकडाऊनमध्ये सगळे घरात बसले होते, तेव्हा पोलीस मात्र कोरोनासाठी संवेदनशील परिस्थिती असलेल्या रस्त्यांवर उतरून कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांना कोरोना ची लागण झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईतील सेवन हिल्स रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र आज पहाटे त्यांची गेले काही दिवस कोरोणाशी सुरू असलेली लढाई संपुष्टात आली व त्यात दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नीलाही कोरोणाची लागण झाली असून त्यांच्यावर त्याच रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. ठाणे ग्रामीण मधील काशिमीरा ट्रॅफिक ब्रँचचे सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर अनिल पवार यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले आहे. गेले ७ दिवस त्यांच्यावर अंधेरी सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. विविध पोलीस ठाण्यात त्यांनी आत्तापर्यंत सीनिअर म्हणून चांगले काम सांभाळले होते आणि आपलं कर्तव्य बजावताना त्यांना कोरोनाची लागण झाली.

- Advertisement -

राज्यभरात वाढलेला कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव, बंदोबस्ताचा प्रचंड वाढलेला ताण, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे वाढलेले प्रश्न आणि त्यातच आरोग्य सोयीसुविधांची होत असलेली आबाळ.. यामुळे राज्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पसरली आहे.

ठाणे जिल्ह्यातील पोलीस दल हळहळले

काशिमीरा चे ट्रॅफिक इन्चार्ज अनिल पवार कोरोना शी लढताना शहीद ठाणे- ठाणे ग्रामीण पोलिसांमधील काशिमिरा ट्रॅफिक ब्रांच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दत्तात्रय पवार यांचे पहाटे कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे दुःखद निधन झाले. अनिल पाटील यांच्यासारखा हरहुन्नरी, मनमिळाऊ व तडफदार पोलीस अधिकारी कोरोणात बळी गेल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ,अधिकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अनिल पवार यांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी दमदार कामगिरी बजावली होती. काही महिन्यांपासून ते ठाणे ग्रामीण पोलिसांच्या काशिमिरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निखिल कौशिक तसेच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवाजी राठोड यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनिल पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – संतापजनक! नराधम डॉक्टराने गर्भपात करून अर्भकाचे केले तुकडे!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -