घरCORONA UPDATEउत्तर मुंबई, ईशान्य मुंबईत आता कोरोनाचा कहर

उत्तर मुंबई, ईशान्य मुंबईत आता कोरोनाचा कहर

Subscribe

कोरोनाचा कहर मागील दोन महिन्यांपासून शहर भागांत जास्त सुरु असून आता कोरोनाने उपनगरांत अधिक ठाण मांडले आहे. उपनगरातील उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबईतच सध्या कोरोनाचे सर्वांधिक रुग्ण आढळून येत आहेत. मागील दोन महिन्यांपासून या दोन्ही लोकसभा मतदार संघांच्या क्षेत्रात कोरोना नियंत्रणात असल्याचे चित्र दिसत असले तरी सध्या मात्र या दोन्ही भागांमध्ये नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्ण वाढीत या दोन्ही भागांमधील आठ विभाग कार्यालयांपैकी महापालिकेचे ७ विभाग कार्यालयांचा समावेश आहे.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णवाढीत मागील दोन महिन्यांपासून उत्तर मुंबईतील आर-उत्तर विभाग सर्वांत तळाच्या क्रमांकावर होते. परंतु सध्या या ठिकाणी रुग्णवाढीचे प्रमाणे ७ .९ टक्क्यांवर पोहोचलेला आहे. या त्याखालोखाल मालाड पी-उत्तर विभाग ६.९ टक्के, कांदिवली आर –दक्षिण विभाग ६.७ टक्के, बोरीवली आर-मध्य विभाग व भांडुप,कांजूर,विक्रोळी या एस विभागागत रुग्ण दरवाढीचा दर ५.७ टक्के एवढा आहे. तर टी विभागात ५.४टक्के एवढा रुग्ण वाढीचा दर आहे. मात्र, यातील मालाड वगळता अन्य सर्व ठिकाणी सुरुवातीपासून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण फारच कमी होते. परंतु सुरुवातीला ज्या वरळी प्रभादेवी, भायखळा-नागपाडा, ग्रँटरोड, धारावी-माहिम-दादर, वडाळा-अँटॉपहिल, शिवडी, आदी भागांमध्ये रुग्ण दरवाढीचे प्रमाण अधिक होते. तिथे आता रुग्ण दरवाढीचे प्रमाण सरासरी २.३ टक्के ते ४ टक्के एवढा आहे. त्यातुलनेत ईशान्य मुंबई व उत्तर मुंबईतील रुग्ण दरवाढीचा दर दुप्पट पहायला मिळत आहे.

- Advertisement -

उत्तर मुंबईतल दहिसर या आर-उत्तर विभागात आता एकूण रुग्णांची संख्या ४८६ एवढी झाली आहे. त्यातील १३० रुग्ण बरे झाले असून ३०० रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर मुलुंड टि विभागात एकूण रुग्णांची संख्या ८५३ एवढी झाली आहे. यामध्ये २९५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ५४९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर मालाड पी-उत्तर विभागात १५८२ एकूण रुग्ण असून त्यातील ११५६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. बोरीवली आर-मध्य विभागात एकूण बाधित रुग्णांची संख्या ९४९ एवढी असून त्यातील सध्या केवळ ६८४ रुग्णांवरच उपचार सुरु आहे. तर कांदिवलीत आर-दक्षिण विभागात एकूण बाधित रुग्णांची संख्या ११६० असून त्यातील ३४१ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे.शिवाय भांडुप-कांजूर आणि विक्रोळी या विभागात एकूण रुग्णांची संख्या १७८६ एवढी असून यातील १२७६ लोकांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यामुळे उत्तर व दक्षिण मुंबईत मागील आठ दिवसांपासून ज्याप्रमाणे रुग्णवाढीचा दर वाढला आहे, त्याप्रमाणे बरे होवून घरी परतणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक दिसत आहे.

एकूण रुग्णांची संख्या व रुग्ण दरवाढीचे प्रमाण

दहिसर आर-उत्तर विभाग : ४८६ (७.९ टक्के)

- Advertisement -

मुलुंड टी विभाग : ८५३ (५.४ टक्के)

मालाड पी-उत्तर विभाग: १५८२ (६.९ टक्के)

बोरीवली आर-मध्य विभाग : ९४९ (५.७ टक्के)

कांदिवलीत आर-दक्षिण विभाग : ११६० (६.७ टक्के)

भांडुप-कांजूर आणि विक्रोळी एस विभाग : १७८६ (७.७ टक्के)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -