घरCORONA UPDATEधक्कादायक! डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून क्वॉरंटाईन व्यक्ती पळाला

धक्कादायक! डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून क्वॉरंटाईन व्यक्ती पळाला

Subscribe

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून एक क्वॉरंटाईन व्यक्ती पळाल्याची घटना घडली आहे.

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून एक क्वॉरंटाईन व्यक्ती पळाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस तपास करीत आहेत.

कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या २४ वर

कल्याण आणि डोंबिवलीत कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या २४ वर पोहोचली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. लग्न सोहळ्यात कोरोनाग्रस्त तरुण सहभागी झाल्याने त्याच्या संसर्गापासून अनेकांना लागण झाल्याचा प्रकारही घडला आहे. त्याच लग्न सोहळ्यातील अनेकांना पोलिसांनी होम क्वॉरंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर अनेकांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. मात्र, होम क्वॉरंटाईन असलेला एक व्यक्ती पळून गेल्याचा प्रकार घडल्याने प्रशासन आणि पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने या व्यक्तीला क्वॉरंटाईन करण्यात आले होते. मात्र, पालिकेच्या रुग्णालयात कोणत्याच सुविधा मिळत नसल्याने आणि चांगली सोय नसल्याने पळून गेल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जगभरात कोरोनामुळे ६४ हजार लोकांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -