घरताज्या घडामोडीCoronaVirus: 'त्या' व्हिडिओवरून विरोधकांनी राजकारण करू नका - राजेश टोपे

CoronaVirus: ‘त्या’ व्हिडिओवरून विरोधकांनी राजकारण करू नका – राजेश टोपे

Subscribe

सायन रुग्णालयातील त्या व्हिडिओमुळे विरोधीपक्षांच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी विरोधकांना इशार दिला आहे.

मुंबईतील सायना रुग्णालयात एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. सायन रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाशेजारीच इतर रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव या व्हिडिओमधून समोर आलं होतं. हा व्हिडिओवर भाजपाच्या काही नेत्यांनी जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इशारा दिला की, ‘कोरोना मृतांचं राजकारण करू नका. तसंच मृतांना आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांना अपमानित करू नका. जर सभ्यता पाळायलाही विरोधीपक्ष तयार नसेल तर मी असले घाणेरडे राजकारण सहन करणार नाही.’

पुढे राजेश टोपे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही आक्षेप उपस्थित केले होते. याकडे त्यांनी लक्ष वेधून म्हणाले की, ‘कोरोनाच्या लढाईत स्वतःचा विचार न करता डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांवर उपचार करत आहेत. ही वस्तुस्थिती समजून घेऊन त्यानंतर योग्य ती टीका करावी.’

- Advertisement -

जेव्हा कोणात्याही रुग्णांचा मृत्यू होतो तेव्हा नातेवाईकांना कळवण, मृतदेह दुसऱ्या ठिकणी हलवणे, मॉर्गमध्ये जागेची व्यवस्था करणे यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी थोडा वेळ लागतो. अशा परिस्थिती जर शेजारी असलेल्या रुग्णाला औषध देणे आणि धीर देण्याचे काम नर्स किंवा डॉक्टर करत असलेत तर मृतदेहाच्या शेजारी रुग्णावर उपचार अशा प्रकारचा व्हिडिओ काढणे हा गंभीर गुन्हा आहे. जर या व्हिडिओच्या आधारे विरोधक टिका करत असतील तर हा त्यापेक्षा गंभीर गुन्हा असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सतत बदलणार्‍या निर्णयांमुळे लोकांमध्ये संभ्रम; भुजबळांचा सरकारला घरचा आहेर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -