घरमुंबईकेईएमची लॅब करणार कस्तुरबाचा भार हलका; तपासणी काळ होणार कमी

केईएमची लॅब करणार कस्तुरबाचा भार हलका; तपासणी काळ होणार कमी

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर कस्तुरबानंतर पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्येही नमुन्यांची चाचणी केली जाणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर कस्तुरबानंतर पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्येही नमुन्यांची चाचणी केली जाणार आहे. गुरुवारपासून ही करोना व्हायरस चाचणी लॅब सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे रुग्णांचा तपासणी प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे, कस्तुरबाचा केईएम हॉस्पिटलमधून भार हलका होणार आहे. या कामासाठी ५० पेक्षा जास्त कर्मचारी नेमण्यात आले आहेत. केईएम हॉस्पिटच्या करोना लॅबमध्ये सकाळी ११ वाजता १२ नमुने तपासणीसाठी आले होते. सध्या दोन शिफ्टमध्ये हे काम सुरु झाले असून गरजेनुसार शिफ्ट वाढवण्यात येणार असल्याची माहिती केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे. पण, येथे रुग्णांची तपासणी करण्यात येणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, करोना रुग्णांची केईएममध्ये गर्दी होणार नाही.

काम २४ तास सुरु राहणार

करोना व्हायरसची तपासणी आतापर्यंत कस्तुरबा हॉस्पिटलमधील एकमेव लॅबमध्ये करण्यात येत होती. त्यामुळे, येथे तपासणी नमुन्यांचा भार दिवसेंदिवस वाढत होता. राज्य सरकारच्या तातडीच्या निर्णयातून केईएम हॉस्पिटलमध्येही लॅब सुरु करण्यात आली. त्यामुळे, कस्तुरबा लॅबवरील भार कमी होणार आहे. याविषयी माहिती देताना केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, ” केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांची टिम कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये जाऊन नमुने घेऊन येणार आहेत. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आलेले तपासणी नमुन्यांची विभागणी कस्तुरबा आणि केईएमच्या लॅबमध्ये होणार आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता पहिली १२ नमुन्यांची बॅच आली. अशा तीन बॅच तपासल्या जाणार आहेत. पहिल्या दिवशी अशा ३० बॅच तपासण्यात आल्या. हे काम २४ तास सुरु राहणार आहे. ”

- Advertisement -

रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी होणार

केईएम हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच लॅब होती. त्यात आता ऑटोमेटर एक्स्ट्राक्टर घेतले असल्याची माहितीही डॉ. देशमुख यांनी दिली. नमुन्यांची संख्या, प्रशिक्षण आणि कामाचा वेग वाढला की तपासणीचं काम तीन शिफ्टमध्ये करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. आता सध्या एका घटकेला ३० ची बॅच तपासण्याची क्षमता आहे. केईएमच्या नव्या इमारतीतील सातव्या मजल्यावर ही लॅब सुरु करण्यात आली आहे. या लॅबमुळे रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे. यासाठी आयसीएमआरकडून निधी मिळाला आहे.

केईएममध्ये फक्त विषाणू अभ्यासावर लॅब सुरू करणार 

केईएम हॉस्पिटलमध्ये निव्वळ विषाणू अभ्यास आणि संशोधनासाठी लॅब तयार करण्याचे काम सुरु आहे. याला व्हिआरडीएल लॅब असं म्हटलं जातं. त्यासाठी स्टाफही देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -