घरCORONA UPDATECoronaVirus: सरकारला मदत करण्यासाठी विद्यापीठ सरसावले

CoronaVirus: सरकारला मदत करण्यासाठी विद्यापीठ सरसावले

Subscribe

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी मदतीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले.

कोरोनावर मात करण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. सरकारच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला असून सरकारला सर्वोतोपरी मदत करण्याची तयारी विद्यापीठाने दर्शविली असून याबाबतचे पत्र मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. कोरोनाच्या संकटवार मात करण्यासाठी आणि कोरोना बाधीत, संक्रमित व्यक्तींच्या विलगीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता लागणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या ताब्यातील वसतिगृहे, गेस्ट हॉऊसेस, आयटी-पार्ट इमारत, भाषा भवन इमारतीची जागा विलगीकरणासाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. त्याचबरोबर संविधानिक पदांवरील व्यक्तिंचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रुपये १० हजार भत्ता दिला जाणार

तसेच संकटकालिन परिस्थितीतही आपली जबाबदारी आणि कर्तव्ये पार पाडणाऱ्या विद्यापीठातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रुपये १० हजार प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. तसेच त्यांना विम्याचे संरक्षण देण्याचीही बाब विद्यापीठाच्या विराचाधीन आहे. याचबरोबर विद्यापीठातील आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण करत, थर्मल मशिन, एन-९५ मास्क अशा अत्यावश्यक सोयी-सुविधांसह, वसतीगृहातील विद्यार्थी आणि अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था आणि इतर अनुषंगिक बाबींना प्राथमिकता देण्यात येत असल्याचेही कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: ‘हा’ App क्वारंटाईन व्यक्तीवर लक्ष ठेवणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -