घरCORONA UPDATEपुण्यात २४ तासात आणखी दोन बळी; राज्यात मृतांचा आकडा वाढला

पुण्यात २४ तासात आणखी दोन बळी; राज्यात मृतांचा आकडा वाढला

Subscribe

कोरोनामुळे पुण्यात चोवीस तासात आणखी दोन बळी गेले आहेत.

मुंबईपाठोपाठ आता पुण्यात देखील कोरोनाग्रस्तांच्या मृतांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. पुण्यात कोरोनामुळे चोवीस तासात आणखी दोन बळी गेले आहेत. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर एका ४८ वर्षीय पुरुषाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन्हीही रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामधील एका ६० वर्षीय महिलेवर पुण्याच्या नायडू रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तिला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. मात्र, पुन्हा प्रकृती बिघडल्याने तिला शनिवारी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. परंतु, या महिलेचे मृत्यूपूर्वी घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून क्वॉरंटाईन व्यक्ती पळाला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -