घरताज्या घडामोडीमहानगरपालिकेची सॅप प्रणाली २६ नोव्हेंबर पर्यंत बंद

महानगरपालिकेची सॅप प्रणाली २६ नोव्हेंबर पर्यंत बंद

Subscribe

काही अपरिहार्य तांत्रिक बाबींमुळे अद्ययावत करण्याच्या कामांमध्ये अधिक कालावधी हवा असल्याने ही मुदत आता २६ नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

मुंबईकरांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उपयोगात येणाऱ्या ‘सॅप’ संगणकीय प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याचे काम १३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू आहे. हे काम २६ नोव्हेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. सॅप प्रणाली अद्ययावत करण्यासह त्यात नवीन वैशिष्ट्यांचा समावेश करण्यासाठी १३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२० पर्यंत सॅप प्रणाली बंद राहणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. काही अपरिहार्य तांत्रिक बाबींमुळे अद्ययावत करण्याच्या कामांमध्ये अधिक कालावधी हवा असल्याने ही मुदत आता २६ नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

असे असले तरी, या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या सॅप प्रणालीव्यतिरिक्त इतर सेवा या नेहमीप्रमाणेच सुरु राहणार आहेत. जसे की, मालमत्ता कराचा भरणा करण्याकरिता https://ptaxportal.mcgm.gov.in, जलदेयकांचा भरणा करण्यासाठी https://aquaptax.mcgm.gov.in तसेच ऑनलाईन इमारत बांधकाम परवानगीच्या अर्जाकरिता https://autodcr.mcgm.gov.in या वेबसाईट्स कार्यान्वित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही.

- Advertisement -

बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वोत्तम व तत्पर सेवा देत आहे. सॅप या मूलभूत सॉफ्टवेअर प्रणालीचा उपयोग करुन मुंबईकर नागरिक, कंत्राटदार तसेच महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्याशी निगडित प्रशासकीय कामकाजाच्या विविध गरजा पूर्ण करण्यात येत असतात. सॅप प्रणालीमध्ये नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करुन ती अद्ययावत करण्यात येणार आहे. यामुळे सर्वोत्तम सेवा देण्यासह सॅप प्रणाली अधिक सुरक्षित होणार आहे.

ही अद्ययावत वैशिष्ट्यपूर्ण सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सध्या कार्यान्वित असलेल्या सॅप प्रणालीचे सर्व्हर बंद करुन त्याचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. असे केल्याने सॅप प्रणालीमध्ये आतापर्यंत झालेल्या व्यवहारांची सुसंगता राखली जाईल. २३ ऐवजी २६ नोव्हेंबर २०२० पर्यंत सॅप प्रणाली अद्ययावत करण्याचे कामकाज सुरू राहणार आहे.

- Advertisement -

सदर अद्ययावतीकरणच्या कालावधीत संपूर्ण सॅप प्रणाली बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे पालिकेकडून नागरी सुविधा केंद्रांमधील सेवा, निविदा भरणे किंवा कार्यादेश देणे, अधिदान करणे इत्यादी कार्यवाही करता येणार नाही. सॅप प्रणाली बंद राहण्याच्या कालावधीमध्ये नागरिक, कंत्राटदार व सर्व संबंधितांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.


हेही वाचा – अंतिम वर्षाचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -