Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तृतीयपंथी, गरीब, बेघर नागरिकांना अन्न पाकिटे वितरणाची परवागनी द्या, नगरसेविकेची पालिका आयुक्तांकडे...

तृतीयपंथी, गरीब, बेघर नागरिकांना अन्न पाकिटे वितरणाची परवागनी द्या, नगरसेविकेची पालिका आयुक्तांकडे मागणी

लॉकडाऊनमुळे सार्वजनिक ठिकाणी पोलीस फिरु देत नाही

Related Story

- Advertisement -

राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्व हॉटले बंद आणि रोजगार नसल्यामुळे मुंबईतील अनेक नागरिकांचे हाल होत आहेत. मुंबईत असणारेल गरिब, तृतीयपंथी, रस्त्यावर राहणारे बेघर अशा अनेक लोकांवर कडक लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या नागरिकांना पालिकेतर्फे अन्न पाकिटांचे वितरण केले जावे अन्यथा नगरसेवक निधीतून अन्न पाकिटे वाटण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी नगसेविका सोनम जामसूतकर यांनी महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चलह यांच्याकडे केली आहे.

मुंबईत मोठ्या संख्येने बेघर नागरिक राहत आहेत. मुंबईतील रस्त्यावर, रेल्वे स्थानकात, मोकळ्या जागेवर, उड्डाणपुलांच्या खाली अशा अनेक जागी बेघर नागरिक राहत आहेत. कडक लॉकडाऊनमुळे सर्व हॉटले बंद असल्यामुळे तसेच लॉकडाऊन नसताना कोणी काही खायला दिल्यावर त्याच्या जेवणाची सोय होत होती. परंतु आता लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

- Advertisement -

मागील लॉकडाऊनमध्ये स्वयंसेवी संस्था, पालिका आणि राज्य सरकारच्या अन्न पाकिट वितरणामुळे या नागरिकांना आधार मिळत होता. यानंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हॉटले, दुकाने, ढाबे, सामान्य हॉटेलमधून त्यांना दररोज अन्न वाटप होत होते. तसेच तृतीयपंथीयांचे पोटही हातावर भरत होते. परंतु आता संचारबंदी असल्यामुळे त्यांचेही हाल होत आहेत. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक ठिकाणी पोलीस फिरु देत नाही आहेत असे बेघर सांगत आहेत. पालिका दररोज अन्न पाकिटांचे वितरण करत होती त्यामुळे या नागरिकांना आधार मिळत होता. आता राजकीय पक्षांचे अन्न वाटप केंद्र बंद असल्यामुळे पालिकेतर्फे या नागरिकांना अन्न वितरित करण्यात यावे किंवा नगरसेविका निधीतून अन्न पाकिटे वितरीत करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती भायखळा येथील नगसेविका सोनम जामसूतकर यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -