घरताज्या घडामोडी‘करोना’साठी मास्क वाटपात नगरसेवकांचा टास्क

‘करोना’साठी मास्क वाटपात नगरसेवकांचा टास्क

Subscribe

सध्या नगरसेवकांनी जनजागृतीबरोबर मास्क वाटप करण्याची मोहिम देखील हाती घेतली आहे.

‘करोना’चा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेसह शासनानेही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनजागृतीवर भर दिला आहे. मात्र, प्रशासनाबरोबरच या आजारांचा सामना करण्यासाठी नगरसेवकही रस्त्यांवर उतरले आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून नगसेवकांनी मास्क वाटप टास्क घेतला आहे. अनेक नगरसेवकांनी सामाजिक बांधिलकी राखून जनजागृतीबरोबरच मास्कचे वाटप करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

झोपडपट्टी परिसरात सुमारे पाच हजार मास्कचे वाटप

‘करोना’च्या प्रसार रोखण्याच्या दृष्टीकोनातून भाजपचे नगरसेवक आणि सी व डी प्रभाग समिती अध्यक्ष आकाश राज पुरोहित यांनी आपल्या प्रभागांमध्ये या आजारांसंदर्भात जनजागृती पत्रके वाटून त्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबांना दोन मास्क पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल दहा हजार कुटुंबांना अशाप्रकारच्या पत्रकांचे वाटप करून त्याद्वारे दोन मास्कचा पुरवठा करण्यात येत आहे. तर भाजपचे जोगेश्वरी येथील नगरसेवक पंकज यादव यांनी रविवारी विभागातील नवलकर मार्केटमधील कोळी भगिनी तसेच मांस, मटण विक्रेत्यांसह गाळेधारकांना मास्कचे वाटप केले. तर भाजपच्या नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनीही जोगेश्वरी परिसरात मास्क वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तर भाजपचे गोरेगावमधील भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी झोपडपट्टी परिसरात सुमारे पाच हजार मास्कचा वाटप करण्याचा उपक्रम आखला आहे.

- Advertisement -

मुंबईत मोठ्याप्रमाणात मास्कचा तुटवडा

तर शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी किडवाई नगर आणि शिवडी पोलिस स्टेशनच्या कर्मचार्‍यांना मास्कचे वाटप करत जनजागृतीची मोहिम राबवली आहे. शिवसेना नगरसेविका माधुरी योगेश भोईर यांनीही कांदिवली परिसरात मास्कच्या वाटपाचा कार्यक्रम आखला आहे. तर बहुतांशी सर्वच नगरसेवकांनी अशाप्रकारे ‘करोना’चा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी जनजागृती मोहिम राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईत मोठ्याप्रमाणात मास्कचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे वेळेवर मास्क उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे मंगळवारपासून अनेक भागांमध्ये जनजागृती संदर्भातील पत्रके तसेच मास्कचे वाटप होणार आहे. याशिवाय अनेक नगरसेवकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी जनतेला घाबरुन न जाता कोणती काळजी घ्यावी यासंदर्भातही समाज माध्यमावर जनजागृती मोहिम राबवण्यास सुरुवात केलेली आहे.


हेही वाचा – गोदरेज कंपनीने महापौरांकडे केले एक लाख हॅण्डवॉश सुपूर्द

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -