घरमुंबई'प्रजा'च्या प्रगती पुस्तकात शिवसेनेच्या सुजाता पाटेकर नंबर वन!

‘प्रजा’च्या प्रगती पुस्तकात शिवसेनेच्या सुजाता पाटेकर नंबर वन!

Subscribe

‘प्रजा’च्या या प्रगती पुस्तकांमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर नगरसेविकांनीच बाजी मारली आहे. यंदाही पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत नगरसेविकांची उत्कृष्ट कामगिरी आहे.

प्रजा फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी प्रकाशित करण्यात येणार्‍या मुंबईतील नगरसेवकांच्या प्रगती पुस्तकांमध्ये यंदा शिवसेनेच्या दहिसरमधील नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. ‘प्रजा’च्या या प्रगती पुस्तकांमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर नगरसेविकांनीच बाजी मारलेली असून शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि भाजपाच्या सेजल देसाई यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.

नगरसेविकांची उत्कृष्ट कामगिरी

प्रजा फाऊंडेशनने बुधवारी मुंबईसाठी आपले ७वे नगरसेवकांचे प्रगती पुस्तक जाहीर केले. या अहवालात महापालिकेच्या नगरसेवकांचे सभागृहातील विचारविनियम, त्यांचे कामकाज आणि त्यांच्या मतदार संघातील कामांबद्दलची धारणा आदींचे विश्लेषण करत नगरसेवकांना त्यांच्या कामांनुसार क्रमांक दिले आहे. यामध्ये शिवसेना नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी ८२.३० टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर किशोरी पेडणेकर यांनी ८१.२५ टक्के गुण मिळवत दुसरा तर भाजपाच्या सेजल देसाई यांनी ७७.३३ टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला असल्याची घोषणा ‘प्रजा’चे संचालक मिलिंद म्हस्के यांनी स्पष्ट केले. तर नगरसेविका आता आपल्या पुरुष सहकार्‍यांपेक्षा उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. हे मागील ३ कार्यकाळातील ७ नगरसेवकांच्या प्रगतीपुस्तकावरून स्पष्ट होत असल्याचे प्रजा फाऊंडेशनचे संस्थापक व विश्वस्त निताई मेहता यांनी स्पष्ट केले. प्रभागातील तक्रारींबाबत प्रश्न विचारण्याच्या दृष्टीने सरासरी ५० टक्क्यांहून अधिक असलेल्या १५ नगरसेवकांपैकी ११ नगरसेविका आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपाला मालाड खुणावतोय!

काँग्रेसच्या नगरसेवकांची कामगिरी अव्वल

प्रजाच्या प्रगतीपुस्तकात महापालिकेत सत्तेवर असलेली शिवसेना आणि राज्यात सत्तेवर असलेली भाजपा आता मागे सरकली आहे. विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षाला प्रजाने पहिला क्रमांक दिला आहे. या प्रगतीपुस्तकात काँग्रेसची सरासरी गुणसंख्या (६१.६१ टक्के), तर शिवसेना (५९.५४ टक्के)व भाजप (५९.५४ टक्के ) आहे. मागील टर्मच्या दुसर्‍या वर्षाच्या तुलनेत भाजपा नगरसेवकांची कामगिरी घसरली आहे. २०१४मध्ये भाजपला ६५.२६ टक्के गुण मिळाले होते. तर त्यावेळी शिवसेना ६०.५६टक्के व काँग्रेस ५८.६०टक्के एवढे मिळाले होते. त्यामुळे पाच वर्षांत काँग्रेसच्या नगरसेवकांची कामगिरी उत्तम झाली असल्याचे ‘प्रजा’ने म्हटले आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत समाधान व्यक्त करत राज्यात आणि महापालिकेत सत्तेत असलेल्या नगरसेवकांच्या तुलनेत काँग्रेसचे नगरसेवक चांगले काम करतात, चांगले मुद्दे मांडतात हे किमान या अहवालाच्या माध्यमातून समोर आले आहे. यामुळे आता काँग्रेस नगरसेवकांचा विधानसभेच्या निवडणुकीत काम करण्याचा उत्साह नक्कीच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -