अलिबाग हादरले,  मुलांना विष देऊन महिला आणि पुरूषाने घेतला गळफास

गेल्या ११ तारखेपासून ते येथे ब्लॉसम कॉटेजमध्ये वास्तव्यास होते. सोमवारी रूममध्ये गेल्यापासून मंगळवारी सकाळपर्यंत दरवाजा उघडत नसल्याने तसेच काहीच हालचाल दिसून येत नसल्याने दुपारी 3 च्या सुमारास कॉटेज मालकाने दरवाजा उघडला.

अलिबागमध्ये फिरण्यासाठी आलेल्या महिला व पुरुषाने मुलाची आणि मुलीची विष देऊन हत्या केली. त्यानंतर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. शहरातील ब्लोसम कॉटेजमध्ये ही घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे शहरासह तालुका हादरला आहे.

कुणाल चिंतामण गायकवाड (29, रा. इंगवले मळा, जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे), प्रियंका संदीप इंगळे (25), भक्ती संदीप इंगळे (5) आणि माऊली संदीप इंगळे (3, रा. पैठण-औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत. गेल्या ११ तारखेपासून ते येथे ब्लॉसम कॉटेजमध्ये वास्तव्यास होते. सोमवारी रूममध्ये गेल्यापासून मंगळवारी सकाळपर्यंत दरवाजा उघडत नसल्याने तसेच काहीच हालचाल दिसून येत नसल्याने दुपारी 3 च्या सुमारास कॉटेज मालकाने दरवाजा उघडला. यावेळी मुलांचे मृतदेह बेडवर दिसले. तर दोघांनी गळफास लावलेला दिसून आला. याप्रकरणी अलिबाग पोलिसांना माहिती देताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले.

पोलिसांनी पंचनामा करून चौघांचेही मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. मृतांच्या कुंटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मृतांचे नातेवाईक आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.