घरमुंबईविकृत दाम्पत्याचे अल्पवयीन मुलींवर अत्याचार

विकृत दाम्पत्याचे अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Subscribe

अल्पवयीन मुलींवर एका विकृत दाम्पत्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याला आणि एका विधवा महिलेला अटक केली आहे.

घरकामाच्या बहाण्याने नेऊन १४ वर्षाच्या मुलीवर एका विकृत दाम्पत्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मिरा रोड येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने आणि त्याच्या पत्नीने मिळून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डी.एन.नगर पोलिसांनी या दोघांसह मुली पुरवणाऱ्या विधवा महिलेला अटक केली आहे. या दाम्पत्याने आता पर्यंत दोन मुलींवर अत्याचार केले असून त्यातील एक मुलगी आरोपी विधवा महिलेची मुलगी असल्याचे समोर आले आहे.

कोण होती ही विधवा?

मिरा रोड येथे राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याला ही विधवा मुली पुरवण्याचे काम करायची. हे दाम्पत्य अल्पवयीन मुलींवर अत्याचार करायचे. या विधवेने सुरुवातीला आपल्या स्वत:च्या १६ वर्षाच्या मुलीलाच दाम्पत्याच्या घरी पाठवले. हा व्यावसायिक आपल्या पत्नीसमोरच मुलीशी लैंगिक चाळे करत असे. तसेच याविषयीची कुठेही वाच्यता केल्यास आणि पोलिसात गेल्यास मारुन टाकू अशी धमकी देखील त्या मुलीला दिली. अखेर हतबल झालेल्या मुलीने घडलेला प्रकार आपल्या विधवा आईला सांगितला. मात्र आपली आई काहीच करत नसल्याने ही मुलगी आपल्यावर होणारे अत्याचार सहन करत राहिली.

- Advertisement -

एका दिवसाचे मिळायचे अडीच हजार

बांधकाम व्यवसायिकाला मुली पुरवण्याचे या विधवेला पैसे मिळायचे. एका दिवसाला ही विधवा आरोपी बांधकाम व्यावसायिकाकडून अडीच हजार रुपये घ्यायची.

मुलीच्या मैत्रिणीला देखील पाठवले

या विधवा महिलेने सर्वप्रथम आपल्या १६ वर्षाच्या मुलीला या व्यावसायिकाच्या घरी पाठवले. या व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीने तीन वेळा विधवेच्या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर या व्यावसायिकाने विधवेकडे दुसऱ्या मुलीची मागणी केली. आता दुसरी मुलगी कोण आणणार म्हणून विधवेने आपल्या मुलीच्या मैत्रिणीला पाठवण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या मैत्रिणीला घर काम करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाच्या मिरा रोडच्या फ्लॅटमध्ये पाठवले. त्यानंतर या विकृत दाम्पत्याने तीन दिवस या मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

- Advertisement -

ती घरी परतलीच नाही

आपली मुलगी घरी परतली नसल्याने मुलीच्या आईने डी.एन.नगर पोलिसात तक्रार दाखल केली. याबाबतची माहिती विधवेने व्यावसायिकाला दिली. त्यानुसार पोलीस घरी येतील या भीतीने या व्यावसायिकाने मुलीला सोडून दिले. मात्र या मुलीने याचा जबरदस्त धसका घेतला. आता आपण कोणला तोंड दाखवणार? काय करणार? कुठे जाणार या विचाराने ही मुलगी घरी परतलीच नाही. तिने २३ जुलैला अंधेरी येथील स्थानकावर रात्र काढली आणि २४ जुलैचा दिवस एका बागेत काढला. परंतु वेदना असह्य होत असल्याने अखेर ही मुलगी घरी परतली. तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. आईला कळताच त्यांनी डी.एन.नगर पोलिसात धाव घेत दाम्पत्य आणि विधवेविरोधात घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत दाम्पत्यासह विधवेला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -