मंत्रालयासमोर दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

mantralaya couple murgande suicide

OBC Reservation backward class commission write letter to state government over insufficient manpower
OBC Reservation: अपुऱ्या मनुष्य बळावर काम कसं करायचे? मागासवर्ग आयोगाचे राज्य सरकारला खरमरीत पत्र

मंत्रालयासमोर एका दाम्पत्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे . राजू चिनप्पा मुरगुंडे असे यातील व्यक्तीचे नाव असून त्याने पत्नीसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्यानेच मुरगंडे दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

गेल्या ८ महिन्यांपासून मुरगंडे आंदोलन करत आहेत. आपल्यावरील अन्यायाला वाचा फुटावी यासाठी या दाम्पत्याला अनेकवेळा मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यामुळे त्यांनी सरकारपर्यंत आपला आवाज पोहचवण्यासाठी आंदोलन केले पण त्यावरूनही सरकारने काहीच हालचली न केल्याने अखेर या दाम्पत्याने अंगावर रॉकेल ओतून स्वत:चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.