Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी वोकहार्ट रुग्णालयात सचिन वाझेंवर होणार उपचार

वोकहार्ट रुग्णालयात सचिन वाझेंवर होणार उपचार

मुंबई सत्र न्यायालयाचा सचिन वाझेंना दिलासा

Related Story

- Advertisement -

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटक ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. सध्या ते एनआयएच्या कोठडीत असून यादरम्यान वाझेंना हृदयविकाराचा त्रास असल्याचे समोर आले. गेल्या आठवड्यात त्यांना भिवंडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वाझेंवर आता मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात उपचार होणार आहेत. या उपचारादरम्यान वाझेंसोबत त्यांच्या पत्नीला राहण्याची मुभा देखील देण्यात आली आहे. यासंदर्भातील सुनावणी आज मुंबईतील सत्र न्यायालयात पार पडली आहे.

दरम्यान सचिन वाझे यांना वैद्यकीय उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी मुंबई सत्र न्यायालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात सचिन वाझेंवर उपचार होणार आहेत. सचिन वाझे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीला राहण्याची मुभा देखील देण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या संदर्भात निर्देश दिले असून विशेष म्हणजे वाझेंचा जो अर्ज न्यायालयासमोर आला होता, त्याला सरकारी वकीलांनी विरोध केला नाही आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी सचिन वाझेंना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी सचिन वाझे यांनी उपचारासाठी न्यायालया पुढे अर्ज सादर केला होता. तो स्वीकारत त्यांना भिवंडीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु आता त्या रुग्णालयात पुढील उपचार होणार नाही आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांच्याकडून मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात यावे, अशा आशयाचा अर्ज न्यायालया पुढे पुन्हा सादर करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी देताना मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात उपचारासाठी वाझेंना मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे.


हेही वाचा – महापालिकेतील सचिन वाझे कोण?, आमदार राहुल नार्वेकर यांचा सवाल


- Advertisement -

 

- Advertisement -