घरमुंबईसचिन वाझेच्या जीवाला धोका तळोजा कारागृह प्रशासनाची न्यायालयाला माहिती

सचिन वाझेच्या जीवाला धोका तळोजा कारागृह प्रशासनाची न्यायालयाला माहिती

Subscribe

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपातील माफीचा साक्षीदार निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्याला रोज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर करता येणार नाही, अशी माहिती तळोजा कारागृह प्रशासनाकडून विशेष एनआयए न्यायालयास देण्यात आली. न्यायालयाने कारागृह प्रशासनाचे म्हणणे मान्य करीत वाझेला न्यायालयासमोर दरवेळेला हजर करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

आपल्याला सुनावणीदरम्यान न्यायालयात आणले जात नाही. केवळ कारागृहातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत न्यायालयात हजर केले जाते. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फतही हजर होत नाही. त्यामुळे सुनावणीवेळी न्यायालयात हजर करण्यात यावे, अशी मागणी सचिन वाझेने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करीत केली होती.

- Advertisement -

त्यावर न्यायालयाने विचारणा केल्यावर वाझेच्या जीवाला धोका असल्याचे आपल्या उत्तरात कारागृह प्रशासनाने न्यायालयाला सांगितले आहे. वाझे दोन महत्त्वाच्या प्रकरणांत माफीचा साक्षीदार बनल्याने त्याच्या जीवाला धोका असल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे, मात्र वाझेला १८ ऑगस्ट रोजी सुनावणीदरम्यान न्यायालयात आणले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -