घरताज्या घडामोडीBooster Dose: राज्यात सोमवार पासून मिळणार बुस्टर डोसची मात्रा

Booster Dose: राज्यात सोमवार पासून मिळणार बुस्टर डोसची मात्रा

Subscribe

६० वर्षे व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याचे किंवा दाखवण्याची आवश्यकता नाही

राज्यातील सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर आज, सोमवारपासून फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीची प्रतिबंधात्मक (प्रिकॉशन डोस)  मात्रा  अर्थात बुस्टर डोस दिला जाणार  आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार हे लसीकरण सुरू होत आहे. राज्यातील सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी तसेच थेट येवून नोंदणी पद्धतीने ही सुविधा उपलब्ध असेल.

कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्‍य कर्मचारी, आघाडीवर (फ्रंटलाईन) काम करणारे कर्मचारी, तसेच ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक ह्यांनी दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून ९ महिने किवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास, ते दिनांक १० जानेवारी २०२२ पासून प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पात्र असतील.

- Advertisement -

६० वर्षे व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याचे किंवा दाखवण्याची आवश्यकता नाही. मात्र, अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.

शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर सर्व पात्र नागरिकांना विनामूल्य प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येईल. मात्र ज्या पात्र नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असेल, अशा नागरिकांसाठी केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या किंमतीमध्येच लसीकरण केले जाईल. लसीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

- Advertisement -

सर्व आरोग्‍य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा कमी आहे  आणि ज्यांची कोविन ऍपवर यापूर्वी लस घेताना कर्मचारी ऐवजी ‘नागरिक’ अशी वर्गवारी नोंद झाली आहे, अशा लाभार्थ्यांचे लसीकरण शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रात थेट येवून (ऑनसाइट/वॉक इन) नोंदणी पद्धतीने उपलब्ध असेल. त्यासाठी त्यांनी नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र अथवा ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असेल. या लाभार्थ्यांना खासगी केंद्रात लस घ्यावयाची असेल तर, त्यांनी शासकीय केंद्रावर येऊन प्रथम योग्य ती वर्गवारी नोंदवावी लागेल. त्यानंतरच त्यांना  लस घेण्याची त्यांना मुभा असेल.


हेही वाचा – Maharashtra Restriction: राज्यातील दारू, वाईन शॉप बंद होणार का?, आरोग्यमंत्री टोपे म्हणतात…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -