घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

CoronaVirus: कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

Subscribe

कोरोनासह इतर व्याधींनी हतबल झालेल्या आणि नैराश्याने ग्रासलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोना विषाणूच्या संकटात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. दरम्यान कोरोनाचीबाधा झाल्याच्या भीतीने हतबल झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

नेमके काय घडले?

एका ६० वर्षीय व्यक्तीला गेल्या आठवड्या अंधेरी मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीवर रुग्णालयाच्या ९ व्या मजल्यावर उपचार सुरु होते. मात्र, या रुग्णाला कोरोनासह इतर देखील व्याधी होत्या. त्यामुळे ते हतबल झाले होते आणि त्याच नैराशेतून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. आज दुपारच्या सुमारास त्यांनी रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, या व्यक्तीच्या मागे आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात येऊन या व्यक्तीला कोरोनाचीबाधा झाल्याचे बोले जात आहे. तर मृत व्यक्तीच्या घरातील सदस्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून त्यांची देखील तपासणी करण्यात आली आहे.


हेही वाचा – म्हाडाच्या सेस इमारतींचे सर्वेक्षण कोरोनामुळे रखडले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -