घरCORONA UPDATEकोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक कोरोनामुक्त

कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक कोरोनामुक्त

Subscribe

कोरोनाविरोधात लढण्यासाठी राज्य सरकारने कोविड टास्क फोर्सची निर्मिती केली होती. ज्याचे प्रमुख डॉ. संजय ओक होते. मात्र काही दिवसांपूर्वी डॉ. ओक यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. डॉ. ओक यांनी कोरोना विषाणूवर यशस्वीरित्या मात केली असून रुग्णालयातून कोरोना विषाणूपासून मुक्त होत ते घरी परतले आहेत.

कोरोनाला अटकाव करण्यासाठी तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या कोविड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक हे प्रमुख होते. मात्र मागच्या शनिवारी त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर टास्क फोर्समधीलच डॉ. राहुल पंडीत यांच्या देखरेखेखाली डॉ. ओक यांच्यावर उपचार सुरु होते. बरे होऊन घरी परतल्यानंतर त्यांना आणखी १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

- Advertisement -

कोरोनापासून मुक्त झाल्यानंतर २० जुलैपासून आपण पुन्हा सक्रीय होऊन काम सुरु करु, अशी प्रतिक्रिया डॉ. ओक यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -