घरताज्या घडामोडीमास्क न लावणाऱ्यांची आता खैर नाही

मास्क न लावणाऱ्यांची आता खैर नाही

Subscribe

एकाच दिवसात मास्क न लावणाऱ्यांकडून  १८ लाखांचा दंड वसूल

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून मास्क लावणे मुंबई महापालिकेने बंधनकारक करूनही लोकांकडून या नियमांचे पालन केले जात नाही. कोरोना गेला या अविर्भावातच नागरिक मास्क न लावता मोकळेपणाने फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईत मास्क न लावणाऱ्यांविरोधातील कडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत.त्यानुसार प्रत्येक विभागांमध्ये या कडक कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे २९ ऑक्टोबरच्या एकाच दिवशी तब्बल १८ लाख २१  हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एकाच  दिवशी ९ हजार १०७ लोकांना हटकून त्यांच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्याची ही आजवरची सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने मास्क न लावणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरुच आहे. कोरोनाचा आजाराला पळवून लावायचा असेल तर मास्क लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क लावले की नाही याची खातरजमा करून घर सोडायला हवे. परंतु महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करत अनेक नागरिक मास्क न लावताच बिनधास्तपणे फिरत आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार ही कारवाई हाती घेण्यात आली होती. ही कारवाई आता अधिक तीव्र होवू लागली आहे.

- Advertisement -

एप्रिलपासून ते २९ ऑक्टोबरपर्यंत १ लाख ६० हजार २७९लोकांवर मास्क न लावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून त्या सर्वांकडून ३ कोटी ४९ लाख ३४ हजार ८०० रुपयांच्या दंडाची रक्कम आजवर वसूल झाली आहे. मात्र आजवरच्या कारवाईत २९ ऑक्टोबरची कारवाई ही विक्रमी ठरली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या २४ विभागांमध्ये  २९ ऑक्टोबर या एकाच दिवशी ९ हजार १०७ लोकांवर कारवाई केली. या कारवाईची विक्रमी नोंद घेतली आहे. यासर्वांकडून प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे १८ लाख २१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

परिमंडळ : १
विभाग : ए, बी, सी, डी,ई
आतापर्यंतची एकूण कारवाई :  २९, ९३८
आतापर्यंत एकूण दंडाची रक्कम : ६५ लाख ५६ हजार १००
२९ तारखेची एकूण कारवाई : १३७१
एकूण दंडाची रक्कम : २ लाख ७४ हजार २००

- Advertisement -

परिमंडळ : २
विभाग : एफ-उत्तर व दक्षिण, जी-उत्तर व दक्षिण
आतापर्यंतची एकूण कारवाई :  २८, २९२
आतापर्यंत एकूण दंडाची रक्कम : ५९ लाख ८९ हजार ७००
२९ तारखेची एकूण कारवाई : १५१०
एकूण दंडाची रक्कम : ३ लाख ०२ हजार

परिमंडळ : ३
विभाग : एच-पूर्व व पश्चिम आणि के-पूर्व
आतापर्यंतची एकूण कारवाई :  १९,७१६
आतापर्यंत एकूण दंडाची रक्कम : ४२ लाख २८ हजार ८००
२९ तारखेची एकूण कारवाई : १३९५
एकूण दंडाची रक्कम : २ लाख ७९ हजार

परिमंडळ : ४
विभाग : के-पश्चिम, पी-दक्षिण व पी-उत्तर
आतापर्यंतची एकूण कारवाई :  २०,९०८
आतापर्यंत एकूण दंडाची रक्कम : ४७ लाख ३१ हजार
२९ तारखेची एकूण कारवाई : १३६८
एकूण दंडाची रक्कम : २ लाख ७३ हजार ६००

परिमंडळ : ५
विभाग : एल,एम-पूर्व व पश्चिम
आतापर्यंतची एकूण कारवाई :  २१,३१२
आतापर्यंत एकूण दंडाची रक्कम : ४७ लाख २५ हजार ९००
२९ तारखेची एकूण कारवाई : ८३६
एकूण दंडाची रक्कम : १  लाख ६७ हजार २००

परिमंडळ : ६
विभाग : एन,एस आणि टी
आतापर्यंतची एकूण कारवाई :  १९,२६६
आतापर्यंत एकूण दंडाची रक्कम : ३८ लाख ९७ हजार ८००
२९ तारखेची एकूण कारवाई : १४७४
एकूण दंडाची रक्कम : २ लाख ७४ हजार ८००

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -