घरमुंबईकोविड रुग्णसंख्या वाढीमुळे आयुक्त संतप्त

कोविड रुग्णसंख्या वाढीमुळे आयुक्त संतप्त

Subscribe

- वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आयुक्तांवर कारवाईचा इशारा- दोन खासगी रुग्णालयांचे स्पेशल ऑडिट

कोविड रुग्णसंख्या वाढीमुळे लेव्हल दोनवरून तीनवर आल्याने वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तांनी सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत संताप व्यक्त केला. रुग्णसंख्या वाढलेल्या प्रभाग समितीतील वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक आयुक्तांवर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा देत आयुक्त गंगाथरन डी. यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या आठवड्यात रुग्णसंख्या वाढल्यामुळे वसई-विरार महापालिका लेव्हल दोनवरून तीनवर पोहोचली आहे. त्यामुळे सोमवारपासून महापालिका हद्दीत निर्बंध लादावे लागले होते. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे सोमवारच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी संताप व्यक्त केला.

या बैठकीत त्यांनी रुग्णसंख्या वाढलेल्या परिसरातील वैद्यकीय अधिकार्‍यांना धारेवर धरले. तसेच सहाय्यक आयुक्तांनाही खडे बोल सुनावले. दरम्यान, ज्या परिसरात रुग्णसंख्या वाढतील तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर संबंधित प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवरही कारवाई केली जाणार आहे. तसा इशारा आयुक्तांनी आढावा बैठकीत दिला. आयुक्तांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक आयुक्तांचे धाबे दणाणले आहे. खासगी रुग्णालयातून होत असलेल्या लुटीचीही गंभीर दखल आयुक्तांनी घेतली आहे. अशा रुग्णालयांच्या बिलांचा ऑडीट करून रुग्णाला दिलासा देण्याचेही निर्देश त्यांनी बैठकीत दिले.

- Advertisement -

स्टार, विनायका हॉस्पिटलचे स्पेशल ऑडीट
वसईतील स्टार आणि विनायका या दोन खासगी कोरोना हॉस्पिटलचे स्पेशल ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे हॉस्पिटल संचालकांचे धाबे दणाणले आहेत. दोन्ही हॉस्पिटलच्या संचालकांनी सोमवारी महापालिकेतील अधिकार्‍यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. विनायका हॉस्पिटलमध्ये एप्रिलमध्ये ऑक्सिजनअभावी सात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याची चौकशी करण्याचे आदेश त्याचवेळी देण्यात आले होते. मात्र, चौकशीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात असून महापालिकेकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -