कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात; महापालिकेकडून जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश

कोरोनाचा (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह (Mumbai) राज्यभरात अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्यास रुग्णांना योग्य उपचार मिळावे, यासाठी माहापिकेने मुंबईत कोविड सेंटरची सुविधा सुरू केली होती.

कोरोनाचा (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह (Mumbai) राज्यभरात अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्यास रुग्णांना योग्य उपचार मिळावे, यासाठी माहापिकेने मुंबईत कोविड सेंटरची सुविधा सुरू केली होती. परंतु, आता मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असताना सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणे असणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आठवडाभरात जम्बो कोविड सेंटर (Jumbo Covid-19 Center) बंद करण्यासाठी कार्यवाही सुरू करणात येणार आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी माहिती दिली. (Covid Centre Jumbo Covid Centre to be closed order by bmc)

रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही केवळ 2 ते 5 टक्क्यांपर्यंत आहे. तसेच, सध्या ॲक्टिव्ह असलेल्या 7 जम्बो कोविड सेंटरमधील सुमारे 15 हजार बेडवर फक्त एक टक्क्यापर्यंतच रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे आठवडाभरात जम्बो कोविड सेंटर (Jumbo Covid Center) बंद करण्यात येणार आहेत.

आवश्यकता भासल्यास बेड उपलब्ध

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट पूर्ण आटोक्यात आली असून, महापालिकेच्या १० पैकी दहिसर, गोरगाव आणि कांजुरमार्ग येथील जम्बो कोविड सेंटर याआधीच बंद जम्बो कोविड सेंटर करण्यात आले आहेत.
जम्बो कोविडच्या ठिकाणी असणारे बेड आणि आरोग्य सुविधा पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याचे पालिकेचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात येणार असली तरी कोणत्याही स्थितीत जादा बेडची आवश्यकता भासल्यास हे बेड उपलब्ध करण्याच्या स्थितीत ठेवण्यात येणार असल्याचेही महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दहा जम्बो कोविड सेंटर

  • दहिसर चेकनाका, कांदरपाडा 700 बेड (बंद)
  • मालाड जम्बो कोविड सेंटर 2200 बेड
  • नेस्को गोरेगाव फेज-1 – 2221 बेड (बंद)
  • नेस्को गोरगाव फेज-2- 1500 बेड (बंद)
  • बीकेसी कोविड सेंटर- 2328 बेड
  • कांजुरमार्ग कोविड सेंटर- 2000 बेड (बंद)
  • शीव जम्बो कोविड सेंटर- 1500 बेड
  • आरसी भायखळा सेंटर- 1000 बेड
  • आरसी मुलुंड जम्बो सेंटर- 1708 बेड
  • सेव्हन हिल्स रुग्णालय, अंधेरी- 1850 बेड

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बंडखोरांचा अडसर, माझं काय चुकलं?, सुहास कांदे विचारणार सवाल