घरCORONA UPDATEcovid guidelines : मुंबईत ओमिक्रॉनची दहशत! इमारतींसाठी नवी नियमावली जाहीर

covid guidelines : मुंबईत ओमिक्रॉनची दहशत! इमारतींसाठी नवी नियमावली जाहीर

Subscribe

मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ७ हजार ६०२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ३७ हजार २७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबईत परिस्थिती चिंताजनक होतेय. यात सोमवारी मुंबईत ८ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यात ४० ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत आगामी काळात कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. मुंबईत इमारातींमध्ये वाढता कोरोना संसर्ग पाहता मुंबई महापालिकेने इमारतींसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. (BMC tightens rules for sealing buildings)

इमारतींसाठीची नवीन नियमावली

१) इमारतीच्या एखाद्या मजल्यावर सक्रिय रुग्ण आढळ्यास तो मजला सील होईल.

- Advertisement -

२) एका इमारतीत १० हून अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील होईल.

३) कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्या मजल्यावरील घरातून बाहेर जाण्या- येण्यास बंदी

- Advertisement -

४) सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या मजल्यावरील तसेच वरच्या आणि खालच्या मजल्यावरील सर्व लोकांची ५ व्या आणि ७ व्या दिवशी कोरोना टेस्ट होईल.

५) सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट झाल्याशिवाय इमारतीचे सील उघडले जाणार नाही. तसेच इमारतीतील नागरिकांना सक्तीने १४ दिवस क्वारंटाईन केले जाईल.

मुंबईत ८ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत सोमवारी सलग आज दुसऱ्या दिवशी ८ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईत सोमवारी ८ हजार ८२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ७ हजार ६०२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ३७ हजार २७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईतील शाळा पुन्हा बंद

कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईतील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पहिली ते नववीचे आणि अकरावीचे वर्ग उद्यापासून ते ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील शाळांबाबतचा निर्णय देखील लवकरचं होण्याची शक्यता आहे.

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे १५ डिसेंबरपासून पहिली ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण मुंबईत सध्या कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण मुंबईत आढळत आहेत.


Unemployment Rate: बेरोजगारीचा दर चार महिन्यांच्या उच्चांकावर; डिसेंबरमध्येच 7.91 टक्क्यांची वाढ


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -