घरCORONA UPDATEThird wave : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट सुरु; 24 तासात 10,860 नवे...

Third wave : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट सुरु; 24 तासात 10,860 नवे रुग्ण

Subscribe

राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी विशेष बैठक घेण्यात येणार आहे.

संपूर्ण जगात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत पाहायला मिळतेय. राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढ होतेय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतोय. त्यामुळे मुंबईत कोरोनाची तिसरी लाट सुरू होताना दिसत आहे.

मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या वर पोहचला आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 10 हजार 860 नवे रुग्ण आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईत आत्तापर्यंत 40 ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन लागणार की काय अशी चिंता सतावत आहे.

- Advertisement -

संपूर्ण राज्याबाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे 18 हजार 466 रुग्ण आले असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 653 रुग्ण हे ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. मात्र मुंबईत कोरोना संसर्गाने भयावह वेग पकडला आहे. या परिस्थितीबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जर प्रकरणे 20 हजारांच्या पुढे गेली तर लॉकडाऊन लागू करावा लागेल. असा इशारा दिला आहे.

त्यामुळे मुंबईत दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा पाहता लवकरचं मुंबईत लॉकडाऊन लागू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.  राज्यामध्ये मंगळवारी 18,466 नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक 10,860, ठाणे 1354, पुणे 1113, नाशिक 308 आणि नागपूर 192 या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी विशेष बैठक घेण्यात येणार आहे.


महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य भोवलं; कालीचरण महाराजाला पुणे पोलिसांकडून अटक


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -