Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीतील लसीकरण बोगसच; लसीचा खरेखोटेपणा होणार मंगळवारी उघड

कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीतील लसीकरण बोगसच; लसीचा खरेखोटेपणा होणार मंगळवारी उघड

हिरानंदानी सोसायटीमधील ३९० रहिवाशांना कोविड प्रतिबंधक लस ३० मे रोजी देण्यात आली.

Related Story

- Advertisement -

पश्चिम उपनगरातील कांदिवली भागातील हिरानंदानी सोसायटीत ३० मे रोजी खासगी लोकांमार्फत पार पडलेले लसीकरण बनावट असल्याचे मुंबई महापालिकेच्या चौकशीत उघडकीस आले आहे. मात्र, त्यासाठी वापरलेली लस खरी होती की खोटी? आणि ती कोणी, कशी मिळवली? याबाबतची गोपनीय माहिती पुणे येथील लस उत्पादक ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या तपासणी अहवालातून मंगळवारपर्यंत उघड होणार आहे. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. कांदिवली येथील बनावट लसीकरण प्रकरण पोलीस आणि पालिकेच्या चौकशीत उघडकीस आले आहे.

हिरानंदानी सोसायटीमधील ३९० रहिवाशांना कोविड प्रतिबंधक लस ३० मे रोजी देण्यात आली. त्यासाठी प्रत्येकी १२६० रुपये याप्रमाणे एकूण ४ लाख ९१ हजार ४०० रुपये या लाभार्थी रहिवाशांनी दिले. मात्र, कोणालाही लसीनंतर त्रास झाला नाही. त्यामुळे संशय आला व त्यातूनच हे लसीकरण बनावट असल्याचे समोर आले.

- Advertisement -

सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा झाली. त्यामुळे जर लसीकरण प्रकार बनावट होता, तर लस खरी की खोटी? असा प्रश्न निर्माण झाला. पालिकेने सदर लसीकरणात वापरलेल्या लसीचे बॅच नंबर पुणे येथील लस उत्पादक ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या लसीची पडताळणी सिरम इन्स्टिट्यूटने केली असून याची माहिती मंगळवारी मुंबई महापालिकेला मिळणार आहे.

सिरमच्या तपासणी अहवालातून लसीकरणासाठी वापरलेली लस ही खरी की खोटी? याबाबतची माहिती आता समोर येणार आहे. महापालिका सिरमने दिलेला पडताळणी अहवाल पोलिसांना देणार असून त्यानुसार पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

- Advertisement -